भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता
जिथे स्त्री जातीचा मान सन्मान होतो तेथे देवता निवास करतात ही गोष्ट बोलून किंवा स्टेटस ठेवून चालत नाही तर प्रत्यक्षात आपण नारीच्या रंग प्रकार आणि रूपा चे प्रकार आत्मसात करायला पाहिजेत
१) पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.
२) दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.
३) तिसरा रंग आपल्याच मुलीकडे टक्केवारी मार्कवाण म्हणून पहायच्यं नाही गुणवान ऑल राऊंडर बनवण्याच्या वृत्ती चा वृत्तीचा.
४) चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा दहावी बारावी पर्यंत चांगल्या मार्गाने शिकलेल्या मुलीला बाप लगेच दुसऱ्याला दावणीला बांधून हात पिवळी करून मोकळे होतो.
५) पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा. चौकात भांडण माणसा माणसांचा होतेय आणि शिवी बोलतो तुझ्या आईची.
६) सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा. दम आणि सहनशिलतेचे प्रतीक आहे, नारी तणाव घेऊन कधी व्यसन करत नाही .
७) सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.( मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी
८) आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.
९) नववा रंग "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा.प्रयत्न करू या
जगाने हे नऊ रंग पाळले तर
आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. समाजातील चार नारी रूपांना आई बहीण पत्नी मुलगी यांच्यासाठी काय कराव वाटत असेल ते मनापासून निस्वार्थ पणे करा .मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही.आयुष्याचेच सोने होईल .