रवींद्र तायडे जामनेर प्रतिनिधी
संत शिरोमणी व क्रांतिकारी सद्गुरु श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची तसेच पोस्टरची ज्याप्रकारे पुणे येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून विटंबना करण्यात आली त्या संदर्भात जामनेर तालुक्यातील सर्व पक्षीय तसेच सर्व सामाजिक संघटना व सेवाभावी संघटना यांनी एकत्र येऊन माननीय तहसीलदार महोदय यांना निवेदन देऊन त्या संबंधित पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचं निलंबन करण्यात यावं! सद्गुरु श्री. सेवालाल महाराज यांच्या विचारांचा पाईक असलेला बंजारा समाज या घटनेने अतिशय सुन्न झालेला असून त्या निंदनीय घटनेचा निषेध करण्याकरिता आज संपुर्ण समाज एकवटला होता.

गुरुदेव सेवा आश्रम चे संत श्री. श्याम चैतन्यजी महाराज, श्री. रमेश नाईक, श्री. निलेश चव्हाण, श्री. मूलचंद नाईक, श्री. सोनू सिंग राठोड, श्री. रामकिशन नाईक, श्री. बाळू चव्हाण, श्री. भानुदास चव्हाण,श्री. संजय राठोड, श्री. इंदल जाधव,श्री. गोपीचंद राठोड, श्री. दीपक चव्हाण, श्री. नटवर चव्हाण, श्री. उदल नाईक, डॉक्टर श्री. विश्वनाथ चव्हाण, श्री. मेघराज नाईक, श्री. अक्षय जाधव, श्री. दिपक पवार, श्री. ब्रिजेश राठोड, सौ. अंजू ताई पवार, श्रीमती निर्मला चव्हाण, सौ.शकुंतला जाधव, श्री.विशाल नाईक, श्री. विकास पवार, श्री. दिनेश पवार, श्री. अक्षय राठोड, व युवा कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते!