भिमराव चाटे देऊळगाव प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील महारचिकणा गावचे सुपुत्र वसंता ताकतोडे यांचा सैनिक सत्कार सोहळा सैन्यातून निरोप देताना कमांडंट साहेबांनी गणर वसंता ताकतोडे यांना दिल्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा.वडिल मा सैनिक साहेबराव गोपाळा ताकतोडे प्रमाणेच सैन्यात सतरा वर्षे सेवा करून मुलगा वसंता पोहोचला जन्मभूमीत, पुढे नातू अमर वसंता ताकतोडे सुद्धा आहे इंडियन आर्मी फॅन, देश प्रेमी
2 ऑक्टोबर गांधी जयंती ला व ज य जवान जय किसान नारा देणारे लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी उत्सवासह सैनिक सत्कार सोहळ्याने महारचिकणा वाशी सुखावले. गावचे भूमिपुत्र अकोल्याचे अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ जी घुगे साहेबा सह सैनिक वसंता ताकतोडे यांनी थोर महापुरुषांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून सैनिकी सॅलूट केले .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ,भारत माता की जय, जय जवान जय किसान व देशभक्ती गाण्यावर बँड पथक सह गावात सकाळी आठ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत मिरवणूक निघाली किसन ताकतोडे सह सर्व माजी सैनिकांनी व गावकऱ्यांनी घेतला हिरारीने भाग अल्पोपहारा नंतर सैनिक सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली

