भीमराव महादेव चाटे देऊळगाव प्रतिनिधी
सेवानिवृत्त सैनिक सैन्य संख्या 15 572405 w हवालदार नंदकिशोर सुभाष आखरे 2003 ला सैन्यात भरती झाले त्या पूर्वीची स्थिती म्हणजे घरी खायची वांदे, मजुरीला गेल्याशिवाय पोट भरायचं नाही. सरकारकडून मिळालेल्या झोपडपट्टी घरकुलlतलं गरिबाचं लेकरू जे दररोज दुसऱ्याच्या धुर्यावर जाऊन दुसऱ्याचे शेत सांभाळत होतं.
देश सांभाळण्याची नोकरी मिळाली. कारण चिकाटी जिद्द आणि सतत मेहनत केली. ट्रेनिंग करून पुढे ते अखनूर जम्मू काश्मीर ,कोटा राजस्थान, तवांग अरुणाचल प्रदेश, झांसी मध्य प्रदेश, भटिंडा पंजाब, गोहाटी आसाम, नागालँड दिमापुर ,मेरठ उत्तर प्रदेश अशा दुर्गम स्थानी प्रतिकूल परिस्थितीमध्ये नोकरी करून , शेवटी पुणे 117 बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधून सेवानिवृत्त झाले.या लोणार सरोवर जवळील गणपुर गाव तसं छोटं पण गावातील लोकांचा जोश खूप आगळावेगळा गावच्या सरपंच सदाशिव चव्हाण यांनी गावात दवंडी दिली उद्या कोणीही शेतात कामाला जाणार नाही
गावात चौकाचौकात भव्य रांगोळी व रस्त्याच्या दुतर्फा वेलकम रांगोळी काढून सकाळीच आठ वाजता सत्कार सोहळा सुरू झाला शिवा तूपकर, कैलास माळेकर, मदन चव्हाण ,अनिल साखरे, दत्ता खरात, अनंता काळे, सुधाकर पडघान, गजानन वायाळ गणेश भाकडे दत्ता पडघान, प्रभाकर पैठणे, गणेश माळेकर, मंगेश चव्हाण, तोताराम गारोळे ,फकीरबाबा डोंगर दिवे ज्ञानेश्वर माळेकर, जगन्नाथ पडघान राजू आखरे ,नामदेव आखरे, प्रकाश साखरे राजू शेवाळे सैनिक मित्र सुखदेव नागरे सर्व जय जवान जय किसान मा सैनिक मित्र फाऊंडेशन भीमराव चाटे आजी माजी सैनिक संपूर्ण गणपुर गावकरी मंडळी यांनी देशभक्ती च्या तालावर बँड पथकासह वाजत गाजत काढलेल्या मिरवणुकीचा आनंद घेतला, जय जवान जय किसान, भारत माता की जय ,वंदे मातरम घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. गावामध्ये एक सैनिक सेवा दर्पण बॅनर बनवून फोटोसहीत ग्रामपंचायत ला आणि शाळेला लावण्याची सरपंचांनी कबूल केले सैनिक परिवारांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले शेवटी नगर भोजना आनंद घेऊन सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली जय हिंद
