गणेश महाजन एरंडोल तालुका
एरंडोल तालुका औषध विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी कैलास मेडिकलचे संचालक कैलास न्याती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एरंडोल तालुका औषध विक्रेता संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा एरंडोल येथे नुकतीच संपन्न झाली.यावेळी एरंडोल तालुका औषध विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी कैलास न्याती यांची तर सचिव पदी कासोदा येथील नितीन पाटील यांची व शहराध्यक्ष पदी सतिष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी कार्यकारिणी ची निवड करण्यात आली व सर्व सभासदां च्या उपस्थितीत एकमताने कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी कासोदा,उत्राण,विखरण,खडके,पिंपळकोठा, निपाने येथील सभासद उपस्थित होते.सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी नूतन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मनोहर पाटील,भुषण पाटील, सतिष पाटील,नितीन शिंपी यांचेसह सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचलन नितीन पाटील यांनी तर आभार कैलास न्याती यांनी मानले.

