Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल नगरपालिका मार्फत प्रभाग क्र . ४ मध्ये स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण

Responsive Ad Here

प्रतिनिधीएरंडोल 

 दि . ०६/१०/२०२१ रोजी पासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात ' नगराध्यक्ष श्री . रमेशसिंग परदेशी , व प्रभाग क्र . ४ मधील सन्मा . नगरसेवक श्री . कृणाल रमेश महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आली . या मोहिमेत मुख्याधिकारी श्री विकास नवाळे , कार्यालय अधिक्षक श्री . हितेश जोगी , आरोग्य निरिक्षक श्री . अनिल महाजन , श्री देवेंद्र शिंदे , डॉ . अजित भट , विवेक कोळी , विनोद पाटील , भूषण महाजन , महेंद्र पाटील , डॉ . योगेश सुकटे 


शिवशंकर ठाकूर , सौरभ बागड , दिपक गोसावी , विकास पंचबुध्दे , प्रियंका जैन , आदीसह अधिकारी कर्मचारी यांनी स्वछता मोहिमेत सहभागी होते . सध्यस्थितीत पावसाळा सुरु असल्यामुळे एरंडोल शहरात साथीचे रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून संपूर्ण शहरातील नाले , गटारी , रस्ते , खुल्या जागा इत्यादीची युध्दीपातळीवर प्रत्येक प्रभागानुसार दर बुधवारी सर्व एकूण १० प्रभागांची साफसफाई करण्याची व वृक्षारोपणांची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे . 

 त्याकरिता नगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारीची चार टिम करुन कामाचे वाटप करण्यात आलेले आहे . या स्वच्छता मोहिमेत प्रभाग क्र . ४ मधील महात्मा फुले पुताळयाजवळ , मारोती मढी या भागातील नाले , गटारी , रस्ते , खुल्या जागेतील परिसरात साफसफाई , फवारणी करुन सदर परिसरातील सौदर्यात भर पडण्याकामी यामध्ये ऑक्सिजन देणारी वृक्ष व फळझाडे यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे . त्याकामी एरंडोल नगरपालिका मार्फत लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांचे संगोपन संबंधित भागातील नागरीकांनी करुन न.पा.स सहकार्य करावे