Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांचे आजी माजी सैनिक व शहीद परिवारांना विविध योजना वर मार्गदर्शन

Responsive Ad Here

 भिमराव  चाटे  प्रतिनिधी देऊळगाव राजा

    देऊळगाव राजा येथे सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघन यांनी सर्व आजी माजी सैनिक एक सैनिक विधवा पत्नी वीर माता पिता वीर पत्नी यांना जवळपास पंचेचाळीस योजना ,आर्थिक मदतीचे प्रकार व सैनिक समस्यावर मार्गदर्शन केले . 

1 प्रथमतः गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतच्या स्तरावरील समस्या व सुविधांचे प्रश्न घेतले. व निराकरण केले. गट विकास अधिकारी साहेबांनी सांगितले की आम्ही स्टेटस ठेवून देशभक्ती दाखवण्या पेक्षा सैनिक परिवाराची जमिनी स्तरावरील सेवा करण्यात देशभक्ती समजतो व तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आजी माजी सैनिकपरिवाराला सहयोग देतील.

2 नगर परिषद देऊळगाव राजा यांच्या अंतर्गत येणारे मालमत्ता कर , नळ सुविधा, रस्ते ,नाल्या व पथदिवे संबंधित न.प. कर अधिकारी गणेश मुळे साहेब यांच्याकडे नोंदवल्या त्यांनी आजी माजी सैनिकांसाठी सेवा देण्यास हमेशा तत्पर आहोत पुढे सुधा नगरपालिका तत्पर राहील असे सांगितले. माजी सैनिकांचा आणि विधवा पत्नींचा शासनाचा शासन निर्णय होता परंतु एक पाऊल पुढे जाऊन सर्व मिल्ट्री पॅरामिलिटरी आजी माजी सैनिकांना मालमत्ता कर मागणीचा ठराव  देऊळगाव राजा  नगरपरिषद नगरसेवक नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी एक मुखाने घेतलेला आहे व पुढे सुद्धा सैनिकास तत्पर सेवा देऊ असे म्हणाले.

3 पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांचे अंतर्गत येणाऱ्या समस्या व तक्रारींचे ठाणेदार जयवंत सातव साहेब यांचे प्रतिनिधी यांच्याकडे मांडण्यात आले. आलेल्या समस्यावर योग्य ती कारवाई करू असे साहेब म्हणाले

4 नायब तहसीलदार विकास राणे साहेब, नायब तहसीलदार प्रीती जाधव मॅडम यांच्याकडे शेती क्षेत्रफळ वाद, धुरा वाद, शेत रस्ता वाद व खोट्या तक्रारी वाद याच्यावर चर्चा करण्यात आली. नायब तहसीलदार विकास राणे साहेब हेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी जास्तीत जास्त गोष्टीवर प्रकाश टाकला वहिवाटी रस्ते नवीन रस्ते मागणी साठी सैनिकांनी शांतपणे येऊन पूर्व कल्पना द्यावी सर्व आजी माजी सैनिकांसाठी प्राथमिकता वर काम करण्यास मी कटिबद्ध आहे असे सांगितले .

   5सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान साहेब यांनी फॅमिली पेन्शन बाबत खूप अडचणी येत आहेत कारण 1986 च्या अगोदर चे चे माजी सैनिक आहेत त्यांना आज पेन्शन मिळते आहे परंतु त्यांचे डॉक्युमेंटेशन पार्ट टू ऑर्डर मध्ये रेकॉर्ड ऑफिसला फॅमिली चे नाव नाही व जन्मतारखा चुकीच्या आहेत या कारणे सैनिकांनी हयात असताना बिनचूक आधार कार्ड सहित  सैनिक रेकॉर्डच्या प्रमाणे आधार कार्ड बनवून घ्यावे व जिल्हा सैनिक कार्यालयाकडून रेकॉर्ड ऑफिस ला पत्र पाठवून नोंदणी करून घ्यावी

6  ECHS CARD एक्स सर्विस मॅन कंट्रीब्युट्री हेल्थ सर्विस कार्ड मेडिकल सुविधा कार्ड सर्व माजी सैनिकांनी बनवून घ्यावे ,ज्यांचे एक हजार रुपये मेडिकल पेन्शन आहे तो बंद करण्याचा अर्ज देऊन ,आर्मी रेकॉर्ड प्रमाणे बिनचूक आधार कार्ड जोडून मेडिकल सुविधा कार्ड बनवून घ्यावे. जेणेकरून भविष्यातील सर्व आपरेशन व गोळ्या चा खर्च टाळता येईल व प्रत्येक जिल्ह्यामध्ये ECHS इन पॅनल हॉस्पिटल मध्ये नेत्रालया मध्ये कमान हॉस्पिटल मध्ये घरापासून हॉस्पिटल ते घरापर्यंत च्या भाड्या सह क्लेम होईल करिता सर्वांनी कार्ड बनवून घ्यावे.


7 कोरोना डेथ केस जे मा सैनिक परिवारातून कोरोना ने मृत्यू पावलेले आहेत त्यांनी कागदपत्रे सादर केल्यास त्यां सैनिक परिवारास आर्थिक मदत मिळते

8 नॉन पेन्शनर मा सैनिक    जे माजी सैनिक काही कारणावरून पुर्ण नोकरी करु शकले नाहीत ज्यांना पेन्शन नाही व त्यांचे वय 65 वर्षे झालेले आहेत अशा माजी सैनिकांना वर्षाचे 48 हजार रुपये मिळतात त्या सैनिकांनी बिनचूक आधार कार्ड सहित फॅमिलीचे सुद्धा नाव नोंदणी करून, जिल्हा सैनिक बोर्डाकडून रेकॉर्ड ऑफिसला पाठवायचे आहे. सैनिकाच्या नंतर सैनिक पत्नीला सुद्धा वयाच्या 65 वर्षानंतर नॉन पेन्शनर च्या सैनिक पत्नीला सुद्धा ही वार्षिक मदत मिळेल. नॉन पेन्शनर चे प्रमाण खूप कमी आहे किंवा त्यांच्यामध्ये जागरुकता नसल्यामुळे ते समोर येत नाहीत ,अशा नॉन पेन्शनर माजी सैनिकांनी समोर येण्याची गरज आहे.

9 मतीमंद आणि अपंग पाल्य ज्या माजी सैनिकांचे या सैनिक विधवांचे पाल्य 50 टक्के पेक्षा जास्त अपंगाचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आहे ,त्यांनी कागदपत्रे सादर करून आर्थिक मदत पेन्शन घ्यावी.

10 सेक्युरिटी ट्रेनिंग सर्व माजी सैनिक यांच्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट व सेक्युरिटी सर्टिफिकेट असते त्यांना सहज सेक्युरिटी ड्युटी वर कोणतेही डिपारमेंट घेते, परंतु माजी सैनिक पाल्यांना बुलढाणा येथे सिक्युरिटी ट्रेनिंग देण्यात येते व एक महिन्यात प्रमाणपत्र मिळते त्यासाठी जिल्हा सैनिक बोर्डाकडून सैनिक पाल्याच्या वयाच्या तीस वर्षाच्या पर्यंत आर्थिक मदत मिळते.

11 हयातीचे  प्रमाणपत्र जे माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा आहेत त्यांनी ऑक्टोंबर नोव्हेंबर ला जीवन डिजिटल प्रमाण ऑनलाईन करून घ्यावे किंवा बँकेमध्ये जाऊन करून घ्यावे जेणेकरून पेन्शन बंद होणार नाही ज्यांना माहित नाही त्यांना जागृत करून सर्वांनी एकमेकांना सांगावे.

  12 केंद्रीय सैनिक बोर्डाकडून 2 सैनिक पाल्यांना 24 हजार रुपये दरवर्षी मिळते प्रत्येक वर्षी शाळेतून पास झाल्याची मार्कशीट सही शिक्का निशी घेऊन ऑनलाइन करावे त्यावर जिल्हा सैनिक बोर्ड चेकिंग करून केंद्रीय सैनिक बोर्डाकडे पाठवते, तो मागील निधी खात्यात क्रेडिट झाला नाही असे बरे का बरेच फोन येतात परंतु कधी ना कधी तरी तो येणारच. त्यासाठी प्रत्येक वर्षी ऑनलाइन करण्यास विसरू नये ही योजना शिपाई हवालदार पदापर्यंत च्या माजी सैनिकांसाठी आहे.


13 घर बांधण्यासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पाच लाख रुपयांपर्यंत बँकेकडून कर्ज घेतल्यास जिल्हा सैनिक बोर्ड दहा टक्क त्यास आर्थिक मदत मिळते

15 स्वयंरोजगारातून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत सध्या ट्रॅक्टरच्या केसला स्थगिती आहे इतर ॲम्बुलन्स हार्वेस्टर ,जेसीबी व व्यवसायिक कर्ज मुर्गी पालन, बकरी पालन साठी अगोदर कर्ज घेणे, बाजार समितीतून बकऱ्या विकत घेणे, त्यांचशेड बनवणे त्यांचा विमा काढणे असा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून, जिल्हा सैनिक बोर्ड कडे सादर केल्यास तीन लाख रुपये सबसिडी अनुदान मिळेल असे सांगितले. अशा बऱ्याच सुविधा शालेय कोर्सेस फीस, कम्प्युटर कोर्सेस फीस, शिष्यवृत्ती एक रकमी पुरस्कार अशा जवळपास पंचेचाळीस योजनावर साहेबांनी प्रकाश टाकला त्यानंतर माजी सैनिक मा तलाठी गजानन सांगळे साहेब व ना सैनिक सुभेदार रमेश आण्णा शेरे साहेब यांचे नाव समितीमध्ये सुचवण्यात आलं सर्वांनी आपल्या समस्या त्यांच्याकडे नोंदवाव्यात त्यांचे समिती मार्फत  तात्काळ निराकरण होईल .वृत्तसंकलन माजी सैनिक प्रतिनिधी नायक भीमराव महादेव चाटे यांनी केले, बैठक तीन तास चालली होती, माहिती अजून पुढील अंकात प्रकाशित केले जाईल. आजी-माजी मिलिटरी पॅरामिलिटरी सैनिक यांच्या समस्या व सुविधेसाठी मा सैनिक मित्र वेल्फेअर बस सतरा सीटर ट्रॅव्हलर फोर्स डिझेल व ड्रायव्हर खर्चावर ना लाभ ना तोटा या तत्त्वावर मागणी करा