प्रतिनिधी देऊळगाव राजा
राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या विचार व कार्यपद्धती वर प्रेरीत होऊन शिवसंग्राम संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष तथा अंबड तालुक्यातील रोहिलागड चे ग्रामपंचायत सदस्य तसेच जालना जिल्ह्यातील एक डॅशिंग नेतृत्व मा. श्री. नारायण टकले पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आैरंगाबाद येथे मा. अनिल चौधरी साहेब अध्यक्ष (प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीरपणे प्रवेश केला आहे. यावेळी अनिल चौधरी साहेब यांनी नारायण टकले पाटील यांचे प्रहार मध्ये प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांचे कार्य व विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून सर्व सामान्य लोकांचे काम करणार असल्याचे यावेळी नारायण पाटील यांनी सांगितले.
यावेळी संतोष राजगुरू सर राजाध्यक्ष (प्रहार शिक्षण शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य), ज्ञानेश्वर भाऊ घोडके प्रहार तालुकाध्यक्ष वैजापूर, लक्ष्मण नवले सर प्रदेश प्रवक्ते (शिवसंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य), शिवनाथ पाटील काळवणे जिल्हा उपाध्यक्ष अ. भा. छावा संघटना जालना), कदिर मौलाना साहाब जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस आैरंगाबाद, श्रीमती पुष्पाताई मुंडे प्रहार सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष अौरंगाबाद, कुणाल भैय्या राऊत सामाजिक कार्यकर्ते, मोहन मुंडे प्रहार जिल्हा समन्वयक जालना, संदीप धुळे प्रहार जिल्हा सचिव जालना, बाळासाहेब काळवणे प्रहार युवा जिल्हाध्यक्ष जालना, विशाल पिंपळे युवा उप जिल्हाध्यक्ष जालना, जुबेर पटेल प्रहार तालुकाध्यक्ष अंबड, महादेव थुटे तालुकाध्यक्ष घनसावंगी, रितेश चंदेल तालुकाध्यक्ष मंठा, लक्ष्मण मिंड प्रहार उपजिल्हाप्रमुख आैरंगाबाद, नितीन तांबे शहराध्यक्ष वैजापूर, आकाश थेटे युवा तालुकाध्यक्ष अंबड, दिपाली ताई पाटील रूग्ण सेविका अहमदनगर, लक्ष्मी ताई देशमुख प्रहार अपंग संघटना तालुकाध्यक्ष शेवगाव, शरद पंडित तालुका उपाध्यक्ष जाफ्राबाद, जग्गनाथ ठाकूर इत्यादी सह असंख्य कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, पत्रकार बंधू उपस्थित होते.