जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
बाजारपेठ कडकडीत बंद
महाराष्ट्र बंद निमित्ताने अमरावती मधल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बस स्टॉप परिसर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचबरोबर अ. भा. किसान सभा सर्व पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत.. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. व सदर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी याबाबतचर संयुक्त रॅली काढून घोषणा देत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थिती होती.
केंद्रसरकारच्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांचे दुष्परिणाम विशद करत केंद्र सरकार कडुन या आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची टीका करत.. उत्तर प्रदेश घटनेची चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी." अशी मागणी आपल्या भाषणातून सर्वपक्षीय नेत्यांनी केली. त्यासोबत उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध व्यक्त करत,शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्याबाबत मागणी केली व दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.