Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रयतेचे स्वराज्य निर्माण करून छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणार -- निलेश भैया दळे

Responsive Ad Here

रामेश्वर जायभाये प्रतिनिधी तळणी 


    तळणी :येथील विर जिवाजी महाले जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र नाभिक महामंडळ तळणी द्वारा आयोजित शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून (युवा नेते) निलेश भैया दळे, होते तर प्रमुख उपस्थिति म्हणून (जालना जिल्हाध्यक्ष) भागवत भाऊ राऊत,(युवक जिल्हाध्यक्ष) सतिश काळे, (सरपंच तळणी) उध्दवराव पवार,  (भाजप जेष्ठ नेते) दारासिंगभाऊ चव्हाण, (शिवसेना ता.अध्यक्ष) माऊली सरकटे,


 (कॉगेस जेष्ठ नेते) आण्णा साहेब खंदारे, (NCP सरचिटणीस महाराष्ट्र) इब्राहिम शेख, (राष्ट्रवादी ता.अध्यक्ष)राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष )ज्ञानेश्वर माऊली सरकटे ( संजय मोरे, (प्रहार ता.अध्यक्ष) रितेश भाऊ चंदेल, (व्याख्याते) पांडुरंग सरकटे, (व्याख्याते व मुख्याध्यापक )गजानन घेटे सर हे होते.

    ज्या प्रमाणे छत्रपति शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा म्हणून वीर जिवाजी महाले यांनी आपले कार्य पाहिले त्याचा प्रमाणे राज्याचे ओबीसी नेते आदरणीय कल्याणराव दळे साहेब यांच्या रूपाने एक सच्चा सिपाही रयतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वात आपन सर्व मिळून राज्यातील बारा बलुतेदार , अलुतेदार व भटके विमुक्त समाजाला सोबत घेऊन छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करू अशे आवाहन युवा नेते निलेश भैया दळे यांनी केले. यावेळी समस्त गावकरी व सर्व समाज बांधव यांनी निलेश भैया दळे यांना समर्थन जाहिर केले व जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची ग्वाही दिली.

   कार्यक्रमाला यशस्वी करन्याकरिता (ता.अध्यक्ष ) गंगाराम बिडवे, (ता.उपाध्यक्ष) प्रदिप मोतेकर, (तळणी सर्कल अध्यक्ष) संपत राऊत, (सर्कल उपाध्यक्ष) राजु शिकारे,  व समस्त नाभिक समाज तळणी सर्कल यांनी अथक परिश्रम घेतले.