Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संत ज्ञानेश्वर प्रायमरी स्कूल च्या माध्यमातून गड व किल्ले बनविण्याची स्पर्धा

Responsive Ad Here

 भीमराव चाटे  प्रतिनिधी देऊळगाव राजा

 मातृतीर्थ पत्रकार संघाच्या वतीने संत ज्ञानेश्वर प्रायमरी स्कूल च्या माध्यमातून गड व किल्ले बनविण्याची स्पर्धा देऊळगावराजा तालुक्यामध्ये ठेवण्यात आली होती त्याचा बक्षीस वितरण सोहळा  झाला आज बक्षीस वितरण सोहळा राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री बुलढाणा पालकमंत्री आमदार राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या हस्ते तसेच देऊळगावराजा नगरीचे बालाजी संस्थाचे वंशपरंपरागत विश्वस्त विजयसिंह राजे जाधव नगराध्यक्ष सुनीता ताई शिंदे, रियाज सेठ ,मनोज भाऊ कायंदे, सर्व तालुका संघ पत्रकार बांधव मातृतिर्थ पत्रकार संघ, माजी सैनिक मित्र व व स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक हजर होते .

सर्वप्रथम आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी अग्रसेन भवन मध्ये ठेवलेल्या बनवलेल्या गड-किल्ल्यांची निरीक्षण केले व प्रत्येक गड किल्ला बनवणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या किल्ल्याची माहिती चांगल्या प्रकारे सांगितली ती  साहेबांनी लक्षपूर्वक पूर्णपणे ऐकून घेतली.

 त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा किरण जायभाये सरांनी इतिहास व गडकिल्ल्यावर लोकजागृती व्हावी इतिहास लोकांना समजावा स्मरणात रहावा व आचरणात आणावा असे सांगितले. प्रथम बक्षीस कुमारी शिवानी केशव निर्मळे द्वितीय चिरंजीव अगस्त्य आई वैशाली वडील बाळकृष्ण तिडके तृतीय सार्थक मंगल घाडगे+ आचल कवळे प्रोत्साहनपर बक्षीस चिरंजीव आदित्य भास्कर शिंदे व इतर श्रावणी माधव कुटे सोहम विनोद भानुसे राखी ओम प्रकाश देशपांडे अनुभव माधव कुटे प्रतिस्पर्धी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ सन्मानित केले गेले तसेच परीक्षक मधुकर जाधव सर परीक्षक किरण जायभाये सर परीक्षक चित्रकला सेवानिवृत्त शिक्षक रमेश गवई सर यांना सन्मानित करण्यात आले 

कार्यक्रमाला तहसीलदार स विजय धमने साहेब ठाणेदार जयवंत सातव साहेब कार्यक्रमास हजर होते सुषमाताई राऊत यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन भाऊ आंधळे यांनी केले पालकमंत्री साहेबांच्या भाषणानंतर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार सुरज गुप्ता यांनी केले चहापाणी अल्पोपहार नंतर कार्यक्रमाची सांगता झाली जय हिंद