Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार जनसेवा मोटर चालक व मालक असोसिएशनची अवैध वराई बंद करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडे मागणी

Responsive Ad Here

मो.असलम परवेज : लोणार तालुका प्रतिनिधी


            संपूर्ण भारतात वराई बंदची ट्रक युनियन कडून मोहिम छेडण्यात आलेली आहे. त्याची अंमलबाजवणी महाराष्ट्रात सुध्दा सुरु झालोली आहे. याच पार्श्वभूमीवर लोणार जनसेवा मोटर चालक व मालक असोसिएशनच्या वतीने दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी गैरकायदेशीर वराई घेणे थांबविण्यात यावी अशी मागणी मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे  करण्यात आली. मा.माथाडी कामगार आयुक्त यांनी सन २०२० चा एका पत्राद्वारे कळविले आहे की, माथडी कायदा अन्वये वराई घेणे हे गैरकायदेशीर आहे. मागील वर्षी कोरोनाच्या साथीमुळे

अवैध वराई बंद मोहीमीचे पत्र प्राप्त असतांना सुध्दा अंमलबजावणी करण्यात आली नाही. परंतू या काळामध्ये ट्रक व्यवसाय हा वाढत्या डिझेल, रोड टैक्स, इन्शुरन्स ईत्यादी वाढीव करामुळे आडचणीत आला आहे. यामुळे सर्व ट्रक मालक चालक, ट्रान्सपोर्ट धारक यांनी येत्या दिनांक १८/१०/२०२१ पासून वराई बंद करण्याचे निर्णय एकमताने घेतला असल्याचे निवेदनामध्ये नमूद आहे.



             तालुक्यातील सर्व संबधीत व्यापारी ट्रान्सपोर्ट धारक व हमाल यांनी ट्रक मालक चालकांकडून वराईची मागणी केल्याची तक्रार उद्भवल्यास पोलीस प्रशासनाने नियमानुसार त्यांच्यावर कार्यवाही व्हावी तसेच तालुक्यातील सर्व संबंधित व्यापाऱ्यांना शासन निर्णयानुसार वराई बंद करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शेख मोहम्मद गफूर शेख इस्माईल, सचिव मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सत्तार, कैसर अली, शेख इकबाल कुरेशी, फेरोज भाई सह संघटनेच्या सर्व सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया

"महाराष्ट्र शासनाचे निर्णय क्र.यु.डब्ल्यू.ए./२०१५ /प्र.क्र.२०१८/कामगार /५ /मंत्रालय, मुंबई दि.०६/०९/१६ नुसार शासकीय निमशासकीय,व्यापारी यांनी ट्रक मालकचालक यांचेकडून हमालीच्या नावाखाली वराईचा खर्च घेणार नाही तसे केल्यास घेणाऱ्या व्यक्तीवर  कार्यवाही करण्याचे प्रावधान आहे. प्रशासनाकडून नियमानुसार कार्यवाहीची अपेक्षा करतो." -शेख मोहम्मद गफुर अध्यक्ष, जनसेवा मोटर चालक व मालक असोसिएशन लोणार