देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी
तामिळनाडू येथील धर्मपुरी येथे ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये फुटसाल असो. बुलडाणा कडून गुरुकुल स्कूल च्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली .या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पूर्ण भारत भरातून संघ सहभागी झाले होते. या स्पर्धा मध्ये महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. पण अंतिम सामन्यात चेन्नई संघाने महाराष्ट्र संघावर २-१ गोल ने विजय मिळविला. महाराष्ट्र संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. या महाराष्ट्र संघामध्ये गुरुकुल स्कूल मधील 1)अथर्व संदीप गाडेकर २) गौरव गजानन पन्हाळे आणि प्रशिक्षक देवानंद नेमाने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या यश्याबद्दल शाळेचे संचालक डॉक्टर मधुसूदन सावळे तसेच संचालिका सौ. डॉ. सविता मधुसुदन सावळे, प्राचार्य डॉ. जितेंद्र मराठे ,सुनील पूर्णपात्रे सचिव इंडिया फुटसाल असो., विजय पळसकर सचिव फुटसाल असो. बुलडाणा व सर्व गुरुकुल स्टाफ यांनी खेळाडू व प्रशिक्षक यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना महाराष्ट्र टीम प्रशिक्षक देवानंद नेमाने अमेर सर, रोहित शिंदे, प्राचार्य डॉ. मराठे सर आणि विजय पळसकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले. खेळाडूंनी त्यांच्या यशाचे श्रेय जिल्हा प्रशिक्षक डी.ए. नेमाने, प्राचार्य डॉ. मराठे सर सर्व गुरुकुल परिवार व आपले आई वडील यांना दिले.