Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आजी-माजी सैनिक तक्रार निवारण समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Responsive Ad Here

 प्रतिनिधी दे राजा. भीमराव  चाटे

 आज देऊळगाव राजा येथे11 ऑक्टोबर 20 21 ला सैनिक कल्याण अधिकारी  भास्कर जी पडघान  साहेब व तहसीलदार विकास राणे साहेब यांचे अध्यक्षतेखाली आजी माजी सैनिक तक्रार निवारण समिती ची बैठक झाली तीन तास चालली बैठक बऱ्याच विषयावर चर्चा झाली अनेक सैनिकांनी आपल्या अडचणी मांडल्या त्यावर अधिकारी वर्ग यांनी मार्गदर्शन केले नगरपरिषदेचे टॅक्स ऑफिसर श्री गणेश मुळे साहेब गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब नायब तहसीलदार प्रीती जाधव ठाणेदार जयवंत सातव साहेब यांचे प्रतिनिधी देऊळगाव राजा जिल्हा सैनिक बोर्ड सैनिक संघटक संजय गायकवाड व पंचक्रोशीतून आलेले सर्व माजी सैनिक कथा माजी सैनिक विधवा यांनी आपल्या समस्या मांडल्या .

सर्व विभागाचे अधिकारी सैनिक जनता दरबार मध्ये एकाच छताखाली हजर होते . सर्व साहेबांनी प्रत्येक सैनिकाचे मत जाणून घेतले व सभेमध्ये आलेल्या प्रश्नांचे निरसन केले.

 प्रथम पोलीस स्टेशन संबंधित प्रश्न मांडण्यात आले .सैनिक कल्याण संघटक भिमराव महादेव चाटे यांनी खंडोबा टेकडी वर माजी सैनिकांनी मिळून ट्रेनिंग ऑप्टिकल लावले होते ते 31 डिसेंबरला रात्री अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याचा रिपोर्ट स्टेशनला दिला होता ते सामान आता सचिन श्रीमंत सवडे नांदखेडा यांच्या शेतामध्ये अर्धवट सापडलेले आहे ते पोलीस स्टेशन मध्ये जमा आहे आणि बाकीचे सामान ट्रेनिंग ऑप्टिकल संबंधित आरोपीने कोठे लपवलेले आहे याचा तपास करून माजी सैनिकांना न्याय देण्यात यावा असे सांगितले. त्यावर साहेबांनी सामान तपास लावून रिकव्हर करू असे सांगितले.

 त्यानंतर माजी सैनिक हवालदार रामदास पवार सिनगाव जहागीर यांनी गट नंबर 36 55 च्या शेतात जाण्याचा रस्ता बुजवून त्यामध्ये ऊस लावला व जाण्यास अडवणूक करत आहे असे सांगितले. व समाईक विहिरीवर सुद्धा जाऊ देत नाहीत, त्यावर साहेबांनी कागदपत्रे जमा करून घेऊन विचार करू असे सांगितले.

 मा सैनिक आसाराम सखाराम झोरे यांच्या पत्नीस पेन्शन मिळण्यास संबंधित कागद कारवाई केली आहे. परंतु पुन्हा एकदा रिमाइंडर देऊन लवकरात लवकर पेन्शन मिळावे अशी विनंती केली. यावर साहेबांनी कागदपत्रे घेऊन पेन्शन मिळण्यासाठी रेकॉर्ड ऑफिस ला जाऊन येण्याचे झोरे साहेबांना सांगितले 

यानंतर सैनिक दत्तात्रय जाधव यांना पायी वाट रस्ता होता गाडी रस्त्याची मागणी केली असताना पैदल रस्ताही बंद केला तो मोकळा करून द्यावा असे सांगितले . नगरपरिषद मालमत्ताकर अधिकारी श्री गणेश मुळे यांच्या अधीन मालमत्ता कराच्या बाबतीत प्रश्न आले नळ पाणी उशिरा मिळते व काही भागात सैनिकांच्या घराभोवती पथदिवे लाईट नाहीत, तेव्हा श्री मुळे साहेबांनी सांगितले नगर परिषद देऊळगाव राजा ही सर्व प्रथम सैनिकांच्या हितासाठी अग्रेसर आहे व अग्रेसर राहील, या अगोदर आपण देऊळगाव राजा नगर परिषद हद्दीतील माजी सैनिकांना च काय सेवारत सैनिकांना सुद्धा मालमत्ता कर माफीचा ठराव घेतलेला आहे .

पथदिवे व लाईटची व्यवस्था लवकरच होऊन जाईल नळाची येण्याची वेळही पंधरा दिवसा वरून आठ दिवसावर येईल असे आम्ही प्रयत्न करत आहोत पहिल्या पाईपलाईन कमी व्यासाच्या होत्या व पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पाणी जाण्यास तीन तास लागत होते आता त्यामध्ये बदल करण्यासाठी सर्वांचे सहयोगाची गरज आहे आपले पाणी भरणे झाल्यानंतर पुढच्या व्यक्तींना पाणी जाऊ देणे ती प्रत्येकाची जिम्मेदारी आहे असे गट विकास अधिकारी श्री कृष्ण इंगळे साहेबांनी सांगितले.  सैनिक विधवा पत्नी मंदोदरी सखाराम वैद्य यांनी आपल्या अपंग मुलाला उदरनिर्वाहासाठी पेन्शन मिळावे याबाबत मागणी केली. यावर 50 टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या माजी सैनिक पाल्यांना पेन्शन मिळते यावर चर्चा झाली.

 कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा करावा असे साहेबांनी सांगितले नायब तहसीलदार विकास राणे साहेबांनी अपंग मुलाला तहसील कार्यालयाकडून सुद्धा पेन्शन मिळेल असे सांगितले तहसीलदार  साहेबांनी शेत रस्ते वहिवाटी रस्ते व नवीन रस्त्याची मागणी या दोन बाबी आहेत प्रत्येक शेताला रस्ता असतो तो आम्ही   दोन्ही पक्षकारांना समन्वय साधून न्यायदाना तून देण्याचा प्रयत्न करत असतो असे विकास राणेंसाहेबांनी सांगितले शेवटी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघन साहेबांनी अनेक शालेय योजना स्वयं रोजगार योजना बचत गट योजना बकरी पालन मुर्गी पालन व त्यांच्या वरील सबसिडी विषय समजून सांगितले व बैठक समाप्त झाली