भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
मातृतिर्थ पत्रकार संघाने गड किल्ले बनवण्याचा उपक्रम राबवला त्याचे पारितोषिक देण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी ची कलाकृती कौतुक केले. किल्ले व त्याची माहिती सांगितली ती खूप मनापासून आवडली आहे असे त्यांनी सांगितले , विद्यार्थ्यांचे मनोबल ,,उंच वाढवावे व या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व ही माहिती सर्वांना ज्ञात व्हावी यासाठी लिहिण्यास पत्रकार बांधवांना बोलले .
साहेब पुढे म्हणाले किनगाव राजा, आडगाव राजा, सिंदखेड राजा देऊळगाव राजा आणि मेहुणा राजा या गावाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू मग त्या कोणत्याही विभागाकडे वर्ग असोत त्यांना जसे आहे तसे जतन करण्याचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये झालेच पाहिजे. याची काळजी घेतली जाईल . मागच्या आठवड्यामध्ये सुप्रियाताई सुळे यांनीसुद्धा या ऐतिहासिक वास्तूचे पाच-सहा तास काळजीपूर्वक निरीक्षण केले आणि या वस्तू राज्य शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे कोणत्याही विभागाकडे वर्ग असल्या तरी त्याचे संवर्धन आपण करू असे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले अनेक राजे होते परंतु शिवाजी महाराज छत्रपती झाले यामागचा इतिहास म्हणजे आयुष्यभर महाराजांनी लढाया जिंकल्या, स्वतःला कधी ऐशो आराम केला नाही ,रयतेचं रयतेसाठी राज्य निर्माण केले. सुराज्य, स्वराज्य निर्माण केले आणि रयतेला सुख कसे मिळेल असे कार्य आयुष्यभर त्यांनी केले. त्यांच्या राज्यात महिला भगिनी सुरक्षित होत्या त्यांच्याच विचाराचा वारसा आपण घेतला पाहिजे व पालन केले पाहिजे असे म्हणाले.
दुर्ग गड किल्ले बनवणे हे येड्या गबाळ्याचे काम नव्हते आजचे इंजिनियर त्यापुढे फेल आहे त्यामध्ये एक खिळा सुद्धा कुठे ठोकला जात नाही एवढे मजबूत आणि खुपिया बनावट त्यावेळची होती ह्या सर्व गोष्टी गड-किल्ले प्रेमींना विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून दाखवाव्यात असे शाळांना आदेश करण्यात येईल व काही संघटनेच्या माध्यमातून या कलाप्रेमींना सहली करण्यास काही अडचणी असल्यास मी आहेच ,असे पालक मंत्री महोदय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब म्हणाले. कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही, भीती बाळगू नका परंतु सुरक्षा बाळगा असे म्हणाले जय हिंद

