Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

1 डिसेंबर पासून राज्यातील शाळा सुरू होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

Responsive Ad Here

मो.असलम परवेज:

  राज्यातील शाळा सुरू कधी होणार? याचे उत्तर जाणण्याची प्रत्येकात उत्सुकता होती. परंतु आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच 01 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की कोरोना संक्रमणामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेले दीड वर्षाहून अधिक काळ हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता शाळा पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

                  शाळा सुरू होणार म्हणजे चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार हे नक्कीच. इयत्ता 5वी ते 12वी शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता 1ली ते 4थी चे वर्गही ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली होती. त्या सोबतच राज्याची कोविड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवी झेंडी दाखवली आहे. आता राज्यात covid-19 संक्रमण ग्रस्तांची संख्या मागील काही महिन्यात सातत्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात सामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारणाने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने कोरोना बाबत निर्बंध शिथिल करत आणले आहेत.



▪️शाळा सुरू करण्यासाठी करावे लागेल खालील नियमांचे पालन▪️


▫️शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

▫️शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.

▫️ विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

▫️ कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

▫️ विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास किंवा तशी लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.

▫️ विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करावी.

▫️ शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे.

     "मा.मुख्यमंत्री,मंत्रिमंडळ व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इ.१ली ते ४थी व शहरी भागात इ.१ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत." वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य