Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिष्यवृत्ती प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क वाढ त्वरीत रद्द करण्याची मागणी

Responsive Ad Here

मो.असलम परवेज


"मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना शेख अब्दुल रहीम यांचे पत्र"


औरंगाबाद- हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, शिक्षण आयुक्त मा.विशाल सोलंकी, शिक्षण संचालक प्राथमिक मा.दिनकर टेमकर यांना शिष्यवृत्ती प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क वाढ रद्द करणे तसेच शाळेतील मुले स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने सक्षम कसे होतील यासाठी वर्ग 5 वीं व 8 वी च्या सर्व मुलांची शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याची कायमस्वरुपी धोरण आखावे अशी विनंती करण्यात आली आहे. 


                  शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी समजली जाते व ही प्रवेश शुल्क वाढ व परीक्षा शुल्क वाढ करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेपासून वंचीत ठेवण्याचा एक मार्ग होय! कारण 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांची आर्थिक परिस्थिती हालखालीची आहे व नुकत्याच अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे याची नोंद घेऊन त्वरित शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा फी वाढ रद्द करून विद्यार्थ्यांना व पालकांना थोडं का होईना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार ने करावे अशी विनंती हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी केली आहे.