Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठीही आता शिक्षकांना मोजावे लागणार पैसे! शासनाचे फर्मान जारी मात्र संघटना विरोधात "प्रशिक्षण पूर्वीप्रमाणे निःशुल्क देण्यात यावे - शेख अब्दुल रहीम"

Responsive Ad Here

मो.असलम परवेज: तालुका प्रतिनिधी



औरंगाबाद- अचानक वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तब्बल 2000 रूपये एका शिक्षक प्रमाणे फी घेण्याचे आदेश धडकले आहे, तरी फि न घेता हे प्रशिक्षण निःशुल्क देण्यात यावे म्हणून हा शासन पत्र त्वरित सुधारित करून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शिक्षकांसाठी निःशुल्क देण्यात यावे असे निवेदन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन द्वारे देण्यात आले आहे. 



                    अनेक दिवसांपासून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रलंबित होतें आज मा.संचालक साहेब, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या पत्रानुसार आयोजित करण्यात आले आहे परंतु या प्रशिक्षणासाठी जे फी आकारण्यात येत आहे ही बाब अन्यायकारक आहे. शालेय शिक्षणमंत्री यांनी याकडे स्वतः लक्ष देऊन हा पत्र रद्द करून हजारो शिक्षकांना न्याय देण्याचे काम करावे. अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी केली आहे. 
                  निवेदनाचे प्रती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण अप्पर मुख्य सचिव तसेच मा.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना पाठविण्यात आली आहे. निवेदनावर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण सर आदींची स्वाक्षरी आहे.