रामेश्वर जायभाये तळणी प्रतिनिधी
मंठाः वाळुचोरी रोखणारे पथक स्थापन तरीही मंठा शहर व ग्रामीण भागातील बांधकामांना सर्रास वाळु उपलब्ध होते कशी ? तळणी पोलीस चौकीलगत दिंडी महामार्गावर वाळुसाठा करण्याची वाळुमाफियात हिंमत येते कुठुन ? चौकीलगत वाळुसाठा होईपर्यत जमादाराचे दुर्लक्ष का ? या प्रकरणी मंठा पोलीस निरीक्षकांकडून जमादाराची उचलबांगडी का होईना ? वरिष्ठ गप्प की वरिष्ठाचे सोईनुसार दुर्लक्ष ? महसूल व पोलीसांचे पथक कारवाईसाठी की फक्त वसूलीसाठी ? वाळू माफियाविरुध्द तळणीचे तलाठी चिचोले यांच्याकडून वेळोवेळी कारवाया मग, इतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून नेमके कुठे ? पथकाची कारवाई ऐवजी फक्त हप्तेवसूलीवर भर ? जालना आरटीओ , जालना ग्रामीण ट्राफिक , परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडुन एकही ठोस कारवाई नाही मग, महिन्याला येणे- जाणे नेमक कशासाठी ? असे एक नव्हे अनेक प्रश्न सर्वसामान्यांकडून उघडपणे विचारले जात आहेत.