Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे १८ डिसेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार आणी भव्य बक्षीस वितरण सोहळाचे आयोजन

Responsive Ad Here

मो. असलम परवेज

"अनेक मान्यवर आणि अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार"

        औरंगाबाद-      हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे आयोजित शिक्षक पुरस्कार आणी भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी शनिवारला औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध भारतरत्न मौलाना आजाद रिसर्च सेंटर, मजनू हिल , टिव्ही सेंटर औरंगाबाद येथे दुपारी ठीक  २:००  वाजता संपन्न होणार आहे.
                  ईद ए मिलाद निमीत्त  प्रेषीत मोहम्मद पैगंबरांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी आणि शिक्षकांच्या लेखनकौशल्याला वाव देण्यासाठी फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव सुद्धा मागविण्यात आले होते. त्याचे परिणाम या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये घोषित करून  मान्यवरांच्या हस्ते एकूण १४ पात्र शिक्षकांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धा चे ७ विजेत्यांना रोख बक्षीस आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना एक शानदार ट्राॕफी, नगद पुरस्कार, प्रमाणपत्र आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी एक विषेश पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे.


                    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार,  तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, औरंगाबाद शिक्षक आमदार विक्रम काळे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे, औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी.बी चव्हाण, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एम.के देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सिल्लोड नगराध्यक्ष राजश्री ताई निकम, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रियराणी पाटील, औरंगाबाद जिल्हा परिषेदेचे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोफी अहेमद लईक, उर्दू डेली औरंगाबाद टाइम्स चे शोएब खुसरो, उर्दू डेली एशिया एक्सप्रेसचे शारीक नक्षबंदी, तसेच प्राचार्य युनूस पटेल, प्राचार्य डॉ. सय्यद नईम, आदींची उपस्थितीत हा सोहळा पार पळणार आहे.
                    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळत हा सोहळा संपन्न होणार आहे तरी  सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर व हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे राज्य कार्यकारिणी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी च्या वतीने करण्यात आले आहे.