वसमत प्रतिनिधी
वसमत नगरपालिकेच्या प्रशासक पदी तहसीलदार अरविंद बोळंगे यांची नियुक्ती झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वसमत नगर परिषदेतील नगर अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक यांचा कार्यकाळ 28 डिसेंबर रोजी संपत असून प्रभाग रचना ओबीसी आरक्षण या कारणामुळे नगरपरिषद निवडणूक लांबल्याने शासनाने नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार वसमत नगर परिषदेच्या प्रशासक पदी वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे नगर परिषद प्रशासक अरविंद बोळंगे हे 29 डिसेंबर रोजी पदभार सांभाळणार असल्याचे कळते.