Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती विचारांना कृतीची साथ देणारी

Responsive Ad Here

 तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा

       आपण कित्येक तास एकमेकांना दोष देण्यात, चुका  शोधण्यात व कुणी काय करावे हे सांगण्यात घालवतो दुसऱ्याने काय करावे हे आपण अत्यंत चांगल्या प्रकारे सांगतो पणं मी ज्या गावात राहतो त्या गावासाठी काय करायला हवे माझी काय जबाबदारी आहे हे समजत नाही आणि समजून देखील घेत नाही. कोरोणाच्या दोन वर्षाच्या विशाल कालखंडानंतर मानवी जीवनात वृक्षाचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. वृक्ष हेच जीवन आहे हे जाणून जवळा येथील ध्येयवेड्या  तरुणांनी एकत्र येऊन गावात कुण्याही व्यक्ती चा वाढदिवस असो गरीब असो वा श्रीमंत त्याचा वाढदिवस वृक्ष देऊन साजरा करतात आणि त्या वृक्षांचे संगोपन करण्याची विनंती करतात. गावातील व्हाट्सअप ग्रुप वर ज्यांचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीची भेट घेऊन त्याला वृक्ष भेट देतात. या उपक्रमाची दखल सिनेअभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी घेऊन त्यांनी या ध्येयवेड्या पोरांनी स्थापन केलेल्या समितीला शुभेच्छा दिल्यात.


             तसेच समितीतर्फे थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करून त्यांचे विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत असतात आणि  समाजासाठी अभिनव उपक्रम राबविले जातात.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षांची लागवड करण्यात आली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जवळा येथील अभ्यासिकेला पुस्तक भेट दिले, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गरजूंना ब्लँकेटचे वाटप केले, तसेच आता  येणाऱ्या 3 जानेवारी २०२२ ला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समितीतर्फे शाळेतील अनाथ आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ड्रेस आणि पुस्तकांचे बुकांचे वाटप हा कार्यक्रम ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीतर्फे समाजासाठी जेवढ होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे . या सर्व उपक्रमासाठी समितीमधील सदस्य आपसातच पैसे गोळा करून हे उपक्रम राबवितात.
           कोरोणाच्या काळात तरुणांसाठी आयोजित करणाऱ्या    खेळांच्या स्पर्धा देखील थांबल्या होत्या. पणं कोरोना नंतर त्या स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात येऊ लागल्या. तसाच एक प्रयत्न ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीतर्फे समितीचे सदस्य आसिफ भाऊ शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ जानेवारी २०२२ पासून टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने घेण्यात आले आहे . त्यामागे समितीचा एकच उद्देश समाजातील ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडू यामधून बाहेर यावेत आणि तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे. असे एक ना अनेक उपक्रम राबविणारी छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती समाजोपयोगी कार्य करून कौतुकाचा विषय ठरली आहे. आणि आजही समितीचे कार्य सुरू आहे. त्यासाठी नरेश रामटेके, असिफ शेख, ज्ञानदीप चोपडे, सुहास पंचभाई, आशिष ढाकुलकर, गणेश धनोडे, उमेश चावरे, राजेश्वर शेलोकार, अमोल ठक, गौरव जाधव, मनोज जाधव, रुपेश आडे, गुलमोहम्मद पठाण, निलेश कोटमकार, अमोल सिस्तकार, मनीष ढाकुलकर, राहुल खंदार, शंकर कुरमेलवार,राम तडसे, साबीर शेख, अभिजीत मुजमुले, योगेश तडसे आदी समितीचे सदस्य असून हे समितीसाठी काम करतात