आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा
तालुक्यातील कुरा डूमणी येथील तीन वर्षीय बालिकेला २० तारखेला दुपारी २ : ३० च्या दरम्यान घरासमोर खेळत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने उचलून नेले .
असल्याची तक्रार बालिकेचे वडील अविनाश चोले यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिली असून अपहरण झालेल्या बालिकेचे नाव मानवी अविनाश चोले वय तीन वर्ष राहणार कुरा डूमणी तालुका आर्णी असे आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार सतीश चौधर करीत आहे.