हिवरखेड प्रतिनिधी:-जितेश कारीया
*प्रवाशी निवाऱ्याला भरधाव कारची जोरदार धडक*
हिवरखेड नजीकच्या तळेगाव बाजार येथील रहिवासी असलेले चौघे जण स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 14 ई यु 5753 ने मलकापूर कडून तळेगाव बाजारला सोमवारी रात्री परतत असताना अकोट शेगाव मार्गावरील रौंदळा फाट्या जवळ चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव कार ने प्रवासी निवार्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये गाडीने तीन ते चार पलट्या खाल्ल्या आणि गाडी पूर्णतः क्षतीग्रस्त झाली. सोबतच प्रवासी निवारा सुद्धा जमीनदोस्त झाला.ह्या भीषण अपघातात वैभव सुरेश मगर (वय 23) आणि विलास चोपडे (वय 45) हे दोन जण ठार झाले आणि सोनू चोपडे, आणि अनिल वाघ हे दोघे जण जखमी झाले. वैभव सुरेश मगर या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर विलास चोपडे यांना अकोला येथे हलवीत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. वैभव मगर याचे तेल्हारा येथे शवविच्छेदन करण्यात आले तर विलास चोपडे यांचे अकोला येथे शवविच्छेदन करण्यात आले. तळेगाव बाजार येथे मंगळवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात वैभव वर अंत्यसंस्कार करण्यात आले तर संध्याकाळी विलास मगर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात एकाच दिवशी गावातील दोन तरुण दगावल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
वैभव मगर हा अत्यंत होतकरू मुलगा होता त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर अल्पावधीतच व्यवसायात जम बसविला होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा युवक म्हणून त्याची ओळख होती. सदर कामासाठी तो जाण्यास इच्छुक नव्हता परंतु मित्रांच्या आग्रहा खातर तो सोबत गेला होता. पण काळाने झडप घातली आणि दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.