Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पूर्णा नदीपात्रातील ६ वाळूघाट लिलाव प्रक्रियेत सर्वेक्षण : २ वाळूघाटात पाणीसाठा तर २ वाळूघाटात कोल्हापूरी बंधारे

Responsive Ad Here

रामेश्वर जायभाये तळणी प्रतीनिधी

        तळणी : पूर्णा नदीपात्रातील १० वाळू पट्टापैकी ६ वाळू पट्टे लिलाव प्रक्रियेत असून २ वाळूघाटात पाणीसाठा तर २ वाळुघाटात सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी व केटीवेअर असल्याने वाळु उत्खननास अयोग्य असल्याचा वाळुघाट सर्वेक्षण सन २०२०-२१ च्या अहवालात तहसील प्रशासनाने म्हटले आहे.

    मंठा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील भूवन , टाकळखोपा- दूधा , कानडी - लिबंखेडा,  कानडी - उस्वद २ , देवठाणा-उस्वद १ व देवठाणा-उस्वद २ हे वाळु घाट उत्खननासाठी योग्य असून लिलाव प्रक्रियेत आहेत. तर भूवन- शिरपूर या संयुक्त वाळूघाटात शिरपूर भागात पाणी व गाळ असल्याने शिरपूर वगळण्यात आले. तर वझर सरकटे व इंचा - सासखेडा या दोन्ही वाळुघाटात सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी व केटीवेअर असून देवठाणा -उस्वद ३ व देवठाणा- उस्वद - खोरवड या वाळुघाटात १०० टक्के पाणीसाठा असल्याने वाळु उत्खननास अयोग्य ठरविण्यात आले. वाळुचे लिलाव नसल्याने बांधकामे रखडली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रिया वेळेवर व्हावी , अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .


ग्रामपंचायतकडून ना-हरकत प्राप्त .

        मंठा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील ६ वाळूघाटाच्या लिलावासाठी ग्रामपंचायतीने ना-हरकत तहसीलकडे प्राप्त झाले.


गुंतवणूकदारांत रोष

  मागील वर्षी संबंधित गुत्तेदारांनी स्थानिकांना टक्केवारी देऊन सहभागी केले होते. त्यामुळे नियमबाह्य व अतिरिक्त उत्खननाकडे स्थानिकांनी दुर्लक्ष केले. मात्र , 'खाबूगिरी' चे कारण देत केवळ ३५ टक्के नफा दाखविल्याने गुंतवणूकदारात रोष व्यक्त होत आहेत.

            या बाबत तळणी - उस्वद सज्जाचे तलाठी नितीन चिचोले यांना विचारले असता , पुर्णा नदीपात्रातील १० पैकी ६ वाळूघाट उत्खनन लिलावासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला. हे सर्वेक्षण कनिष्ठ भूवैज्ञानिक , भूजल सर्वेक्षण जालना व तलाठ्यानी संयुक्त सर्वेक्षण ३१ डिसेंबर व १ जानेवारी दरम्यान प्रत्यक्ष नदीपात्रात जावून केल्याचे चिचोले म्हणाले .