Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड.

Responsive Ad Here

प्रतिनिधी । एरंडोल

    एरंडोल- येथील पत्रकार संजय नारायण चौधरी यांची ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर आमदार प्रतिनिधी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते संजय चौधरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले. पत्रकार संजय चौधरी यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या शिफारशीवरून रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.संजय चौधरी यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.कोरोनाकाळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली होती.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

    यावेळी महिला बाल विकास प्रकल्प  अधिकारी शैलजा पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख,एस.व्ही.सुरवाडे,भूषण महाजन,नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील,डॉ.मुकेश चौधरी,कार्यालय अधिक्षक पंकज पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,उपसभापती अनिल महाजन माजी सभापती दिलीप रोकडे,निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी, उपनगराध्यक्ष कृनाल महाजन,अतुल महाजन, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

एरंडोल येथे संजय चौधरी याना नियुक्तीपत्र देतांना आमदार चिमणराव पाटील त्यांचेसोनात माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रमेश महाजन,शालिग्राम गायकवाड किशोर महाजन व पदाधिकारी

     संजय चौधरी हे माजी उपनगराध्यक्ष असून मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आहेत.ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संजय चौधरी यांनी सांगितले.विविध राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी संजय चौधरी यांच्या नियुक्तीचे स्वागत करून अभिनंदन केले.


.