चोपडा
तालुक्यातील अडावद चोपडा, विटनेर, या गावातील कार्यरत कर्मचारी सफाई कर्मचारी चोपडा येथील जिल्हा रुग्णालयात ठेकेदार यांचे हाताखाली एक ते सात वर्षे स सफाई कर्मचारी म्हणून सेवा देत आहेत.को विड 19काळात जीव धोक्यात घालून या सुशीक्षित बेरोजगारी केवळ 10000रू वेतनावर तेही अनियमित होते तरीही काम केले पण त्यांना दोन महिन्यापूर्वी ठेकेदारांनी बंद केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणी जळगाव जिल्हा आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आय टक ने केली आहे कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर न घेतल्यास येत्या 14 जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात समोर सकाळी 11 वाजता काळे मास्क घालून निदर्शने करण्यात येणार आहेत असा इशारा देणारे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन तसेच कर्मचारी ऋषिकेश महाजन निलेश माडी मयुर नेवे सुमित पाटील राकेश नवल पाटील मंगला साबळे धारा सिंग चवरे यांनी दवाखाना व्यवस्थापन तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी यांना दिले आहे.