Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आकाश निरीक्षणाचा कार्यक्रमाचे आयोजन

Responsive Ad Here

 वसमत प्रतिनिधी


वसमत तालु्क्यातील मातृतीर्थ टोकाई गडावर रविवारी आयोजन


   समाजामध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी यासाठी हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मातृतीर्थ गड टोकाई, कुरुंदा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे खगोल अभ्यासक डॉक्टर रामेश्वर नाईक सर , श्री सुधीर सोनुनकर सर, श्री प्रसाद वाघमारे सर , डॉ विजयकिरण नरवाडे, डॉ रणजित लाड, श्री ओम तलरेजा, श्री वेदप्रकाश आर्य, श्री अशोक लाड सर  हे मार्गदर्शन करणार आहेत.



   पृथ्वी वरून  ध्रुव ता-याची स्थिती, हिवाळा आणि उन्हाळा ऋतूमध्ये असणा-या आकाशातील चांदण्यांची स्थिती, आकाश निरीक्षणाच्या पद्धतीची माहिती, टेलीस्कोपचे विविध प्रकार, सूर्यमाला व आकाशगंगेचे स्वरूप, भारतीय खगोल वैज्ञानिकांची ओळख, नक्षत्र व तारे यांची सविस्तर माहिती, टेलीस्कोप मधून विविध नक्षत्र व तारे यांचे प्रत्यक्ष निरीक्षण, टेलीस्कोप कसा हाताळावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक होणार आहे. Covid-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करून या आकाश निरीक्षणाच्या कार्यक्रमाचा आस्वाद  विद्यार्थी, जनतेने जास्तीत जास्त संख्येने घेऊन आपल्या खगोल विज्ञानाच्या जाणीवा आधिक रुंदवाव्यात असे आवाहन प्रा डॉ नामदेव दळवी  ,श्री एकनाथराव कऱ्हाळे सर, श्री नितीन मोरे, श्री बळवंतराव चव्हाण सर, श्री प्रताप देशपांडे, श्री शिवदास जबडे ,श्री शेखर देशमुख, श्री गोविंद दळवी , श्री गंगादास टोंचर सर यांनी केले आहे.