Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

१५ जानेवारीपासून अशा गट प्रवर्तक यांचा राज्य व्यापी बहिष्कार आंदोलनाचा इशारा

Responsive Ad Here


चोपडा प्रतिनिधी

चोपडा आशा व गटप्रवर्तक यांचे १९ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी योग्य ती कार्यवाही महाराष्ट्र शासनाने न केलेस महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना  कृती समिती तरफे महाराष्ट्र भर येत्या १५ जानेवारीपासून बेमुदत कोविड कामावर बहिष्कार करण्याचा इशारा आय टक ने दिला आहे.

 या बाबत सविस्तर माहिती अशी की ,महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक व कर्मचारी संघटना अशा5 संघटनांच्या या कृती समितीने महाराष्ट्र शासन व आरोग्य खात्याला एकूण 19 मागण्यांचे निवेदन २२/१२/२१ रोजी सादर केले आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मागण्यांची पूर्तता न केल्यास हा बहिष्काराचा इशारा देण्यात आलेला आहे.



 अशी माहिती जळगाव जिल्हा आशा  गातप्रवर्टक व आरोग्य कर्मचारी जिल्हा संघटनेने जाहीर केलेल्या पत्रकात देण्यात आलेली आहे.  कृती समितीने सादर केलेल्या एकोणीस मागण्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने जुलै 2021 पासून जाहीर केलेले मानधन वाढ एप्रिल21 पासुन देण्यात आलेले नाही. दोन महिन्याचे मानधनही दिलेले नाही .कोवीड कामे  निरंतर सहभाग असून सुद्धा त्या कामाचा मोबदला दिलेला नाही. अँड्रॉइड मोबाईल देण्याचे आश्वासन दिले आहे. कोविळ  लसीकरण हर घर दस्तक मोहिमेत भाग घेऊनही ऑक्टोबर21पासून प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही. शिवाय घरच्या मोबाईलवर काम करावे लागत आहे .यावेळी लोकांचे वेळी अवेळी फोन येतात तसेच पण मोबाईल बिले पुरेसे  मिळत नाही .कागदपत्र स्टेशनरीचे वर्षाला तीनशे रुपये पुरत नाहीत .शिवाय आषांच्या गणवेशाची रक्कम त्यांचे खातेवर टाकावी तसेच आशांना करावी लागणारी 74 कामांची लिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात लावावी चाहरडीची..ज्योती अंबर भील या आदिवासी आशाना पूर्ववत कामावर घ्यावे पेसा गाव अतरगत आशाना प्रोत्साहन भत्ता ध्या. आरोग्यवर्धिनी कामासाठी सी एच ओ नेमावेत नागरी भागात गट प्रवर्तक नेमा  आदी अनेक मागण्या न वर चोपडा वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर लासूरकर यांच्याशी चर्चा झाली.

         त्यावेळी कार्यालय स्थापन हजर होता  डॉक्टर लातूरकर यांनी स्थानिक  मानधन  व इतर स्थानिक प्रश्न कार्यवाई करण्याचे आश्वासन दिले म्हणून आशा कर्मचाऱ्यांचे  समाधान व्यक्त केले आहे परंतु कृती समितीच्या सादर केलेल्या इतर मागण्यांसाठी जिल्ह्यात 15 जानेवारीपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा त्यात सहभागी होन्याचा निर्णय चोपडा येथे आशा व गटप्रवर्तक यांच्या बैठकीत घेण्यात आला तथापि कोविळ. व्यतिरिक्त कामे सुरू ठेऊ या बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्याच नेतृत्वाखाली सर्व गोरख वानखेडे श्रीमती वंदना पाटील मीनाक्षी सोनवणे विद्यादेवी कोळी  वंदना सोनार,सुशीला कोळी  संगीता पाटील रत्ना बाविस्कर, मनीषा पाटील रेखा पाटील शालिनी पाटील रंजना धनगर भारती कोळी आदींचे शिष्टमंडळाने डॉक्टर लासूरकर यांना निवेदन सादर केले असे संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे