Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा वीर पत्नींचा सत्कार व अकॅडमी विद्यार्थ्यांना पुरस्कार.

Responsive Ad Here

 भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा

           जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी रयतेचे राज्य घडवणाऱ्या शिवबांना घडवणारी माऊली जिजामाता जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी प्रांगणामध्ये माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर व डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष तसेच बीजेपी नेते डॉ सुनील भाऊ कायंदे अमोल काकड रा स प नेते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले व जिजाऊ मा साहेबांच्या मूर्तीचे पूजन झाले जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अकॅडमीच्या प्रांगणावर सकाळपासून अनेक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या सैन्य भरती व पोलीस भरतीचे इव्हेंट्स हे स्पर्धेचे रूपाने घेऊन त्यातून प्रथम क्रमांकाचे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.

         वीर पत्नी शोभा राम डिगोळे यांच्या हस्ते झेंडा देऊन धावण्याची स्पर्धा घेण्यात आली डॉक्टर सुनील कायंदे साहेब व माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब यांच्या हस्ते वीर पत्नींना साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सैनिक मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष भीमराव चाटे यांनी केले  अकॅडमी संचालक मधुकर आश्रुबा वाघ पीटीआय ट्रेनर रंजन वाघ यांनी स्पर्धा घेतल्या अनील कुमार धरे सर यांनी जिजाऊ मा साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब म्हणाले की देऊळगाव राजा हे शिक्षणाचे माहेरघर आहे .



येथे महाराष्ट्र सैनिक करियर अकॅडमी व राष्ट्रमाता करिअर ॲकॅडमी म्हणजे मन लावून अभ्यास आणि सराव प्रत्येक विद्यार्थ्याने करावा आणि आपण कुठे कमी पडतो त्याचा विचार करावा व सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निर्भयपणे वावरणारे शिवबासारखे जगावे असे सांगितले कार्यक्रमास माजी सैनिक  शरद जायभाये ट्रेनर माजी सैनिक रंजन वाघ माजी सैनिक बद्री नारायण नागरे माजी सैनिक विष्णू घुले माजी सैनिक रमेश बर्डे माजी सैनिक रवी नागरे माजी सैनिक नव नियुक्त पोलीस दिलीप खारडे नागपूर पोलीस माजी सैनिक व तलाठी श्रीमंत पांडव तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या शेवटी फळ वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली