Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विकासकामाचाअनुशेष असलेल्या ग्रामपंचायतींना समाज कल्याण चा निधी द्या, सरपंच परिषदेची मागणी

Responsive Ad Here

प्रतिनिधी राजकुमार कांगणे जालना

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत समाज कल्याण विभागाला विकासाचा अनुशेष असलेल्या दलित वस्तीचा विकास करण्यासाठी आलेला निधी विकासापासून वंचित असलेल्या ग्रामपंचायत  मधील दलित वस्त्यांना द्या अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने निवेदनाद्वारे श्रीमती वैशाली रसाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. 

जालना जिल्ह्यामधील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दलित वस्ती मध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत सिमेंट रस्ते, नाली, पाणी पुरवठा, स्मशानभूमी सह विविध विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित असून हा निधी  ज्या ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती मध्ये आत्तापर्यंत विकास कामे झाली नाहीत पर्यायाने त्या दलित वस्तीचा विकास कामाचा अनुशेष बाकी आहे विकासापासून ज्या दलित वस्त्या वंचित आहे अशा ग्रामपंचायत पंचायतींना समाज कल्याण जिल्हा परिषद अंतर्गत असलेला निधी तात्काळ वितरित करावा त्यामुळे दलित वस्त्यांचा विकास होईल, आतापर्यंत अनेक गावच्या दलित वस्ती विकासापासून वंचित आहेत ही बाब गंभीर स्वरूपाची असून  ग्रामपंचायती गेल्या अनेक वर्षापासून दलित वस्ती विकास कामासाठी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत रीतसर प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण  विभाग जालना यांच्याकडे पाठवतात परंतु त्या ग्रामपंचायतींना समाज कल्याण विभागाचे अधिकारी व संबंधित निधी देत नसल्याने दलित वस्तीवर अन्याय होत आहे.


       ही गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या स्थिती ला जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित असून अनेक गावचे सरपंच निधी मिळवण्यासाठी या विभागाकडे पाठपुरावा करतात परंतु त्या ग्रामपंचायतीला निधी देण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे वरील प्रकारचा निधी नियमाप्रमाणे कोणत्याही गावातील दलित वस्ती वर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन तात्काळ वितरित करावा अन्यथा नाविलाजाने याविरुद्ध आवाज उठून वरिष्ठाकडे दाद मागावी लागेल तसेच दलित वस्ती निधी वाटपात अनियमितता आढळल्यास माननीय न्यायालयातही दाद मागितली जाईल संबंधित दोषीवर कारवाई करण्यासाठी जनहित याचिकाही दाखल करावी लागेल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे.    सदरील निवेदनाच्या प्रति माननीय जिल्हाधिकारी जालना, विभागीय आयुक्त, औरंगाबाद, श्रीमती एस के भोजने समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, जालना यांनाही निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हेलस चे सरपंच पांडुरंग खराबे पाटील व जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच भाऊसाहेब गोरे पाटील, किशोर जाधव, संपत टकले,  अविनाश राठोड, आनंद जाधव, ज्ञानेश्वर गोंडगे, राजेभाऊ खराबे, भगवान लहाने, प्रताप जाधव सौ सीमा हावळे, सौ वत्सलाबाई जाधव यांची उपस्थिती होती   मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जालना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैशाली रसाळ व जि. प. समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस. के. भोजने मॅडम यांनाअखिल भारतीय सरपंच परिषदेकडून जालना जिल्ह्यामधील विकासापासून वंचित  (विकास अनुशेष) असलेल्या दलित वस्त्यांना विकासासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला प्राप्त झालेला निधी नियमानुसार तात्काळ वाटप करा या मागणीचे निवेदन देताना मराठवाडा कार्याध्यक्ष पांडुरंग खराबे पाटील व जिल्ह्यातील सरपंच भाऊसाहेब गोरे संपत टकले किशोर जाधव अविनाश राठोड आनंद जाधव  ज्ञानेश्वर गोंडगे भगवान लहाने राजेभाऊ खराबे कैलास चव्‍हाण सौ सीमा गंगाराम हावळे प्रताप जाधव सौ वत्सलाबाई बबनराव जाधव व जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते