वंदना गवई प्रतिनिधि
चिखली:- तालुक्यातील पांढरदेव येथील राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ता नामदार पालकमंत्री डाॅ राजेंद्र शिंगणे यांचे खंदे समर्थक दिपक संतोषराव म्हस्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिखली तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
दिपक म्हस्के यांनी चिखली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केलेले आहे. यासोबतच सन 2007 ची कव्हळा पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लढवली त्यांच्या कामाची दखल म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून संधी दिली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिखली तालुका अध्यक्ष पदी निवड केली. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री भारत बोंद्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हाध्यक्ष अॅड नाझेर काझी, माजी जिल्हाध्यक्ष अॅड.साहेबराव सरदार, माजी सभापती विनायकराव पाटील यांना देत आहे. दिपक म्हस्के यांच्या निवडीबद्दल पक्षात नवचैत्यन्न निर्माण झाले असुन आगामी स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची ताकत चिखली तालुक्यात नक्कीच वाढवून पक्षाची ताकत वाढवणार असल्याचे मत यावेळी नवनियुक्त तालुका अध्यक्ष दिपक म्हस्के यांनी केले आहे.