भीमराव चाटे प्रतिनिधी दे राजा
सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेच्या अवतीभवती रांगोळी मुलींनी रांगोळी काढल्या भारत माते समोर दीपप्रज्वलन केले व देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक मित्रांचे आभार मानले त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले अकॅडमी संचालक मधुकर वाघ म्हणाले मित्रांनो आज १५ जानेवारी भारतासाठी अभिमानाचा दिवस. कारण आपल्यासाठी जे सैनिक त्यांच घर, दार, संसार, मुलं, आई, वडील सगळ परिवार सोडून सीमेवरती लढत आहेत फक्त आणि फक्त आपल परिवार सुरक्षित झोपावं म्हणून, मित्रांनो आजची तरुण पिढी विविध इंग्रजी दिवस साजरे करते मात्र सांगताना वाईट वाटत की आपल्या तरुणांना सैनिक दिवस साजरा करायला कमी पणा वाटतो. ज्यांना जे आवडतं ते ते करतात परंतु आपण हा उपक्रम केला याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचा आभारी आहे. मित्रांनो लक्षात ठेवा ही संकल्पना आपण बदलली तरच पुढची पिढी तयार होईल पण अनेकदा आपल्यातील सुद्धा बरेच जण म्हणतात जाऊ दे आपल्याला काय सैनिक त्यांच काम करतात आपण आपल काम करू.
मात्र एकदा विचार करून पाहा जो माणूस दिवस रात्र, डोळ्यात तेल घालून, न डगमगता तिकडं बर्फात उभा आहे तो काय त्याला पैसे कमवायचे आहेत म्हणून नव्हे तर त्याच्या अंगात जुनून आहे देशासाठी जीव ओवाळण्याची तयारी आहे म्हणून आपल्या जीवाचे बलिदान देण्यास तत्पर आहे म्हणून आणि विचार करा आज मस्त एयर कंडीशन मध्ये बसणाऱ्या पुढाऱ्याला लाखो रुपये मिळतात मात्र देशासाठी, आपल्यासाठी सतत घाम गाळणाऱ्या भारतीय सैनिकांना मात्र त्याच्या निम्मे देखील मिळत नाहीत आणि हेच आपल्या देशाच दुर्दैव आहे.
चला आपण सर्वजण मिळून ही संकल्पना बदलूया एक नवा आणि जोशीला युवा आत्मनिर्भर भारत बनवूया आपल्या देशाची सेना नेहमी जवान राहावी या उद्देशाने वयाच्या 18 ते 36 या काळातच आपल्या आयुष्याचा गाभा तारूण्य जवानी देशावर कुर्बान करणारे जवान मायनस 40 डिग्री व रेगिस्तान च्या तप्त वाळवंटात सीमा रेषेवर तैनात असतात त्यांना वंदन करूया सैनिकाचा जन्म हा गरीब झोपडी घरकुल किसान मजदूर यांच्या घरातून जे सकाळीच उठून आपल्या पोटाची सोय करण्यासाठी धावतात अशा घरातून होतो आपणही सर्व सकाळ संध्याकाळ ग्राउंड ची प्रॅक्टिस व दिवसभराचे क्लासेस मन लावून करावे आणि फोर्सेस मध्ये भरती होण्यासाठी तुम्हा सर्व नवयुवक युवतींना भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा देतो असे ट्रेनर रंजन वाघ सर म्हणाले
*सर्व सैनिक बांधव !! व देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सर्व भारतीय अमर जवानांना आपल्या सर्वांतर्फे विनम्र अभिवादन*