Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

छत्रपती शिवाजी महाराज एका धर्माची मक्तेदारी नाही- ह.भ.प. आत्माराम वाकोडे यांचे प्रतिपादन.

Responsive Ad Here

प्रतिनिधी हिवरखेड जितेश कारीया

        हिवरखेड  स्थानिक मराठा नगर येथील भवानी माता मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैचारिक, व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख व्याख्याता दिव्या विठ्ठलराव नहाटे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राम प्रभू दादा तराळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महेशदादा गणगने, कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प आत्माराम जी वाकोडे हे उपस्थित होते.त्याच बरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून हिवरखेड ग्रामपंचायत सरपंच सौ सीमाताई संतोष जी राऊत, मा. शोएब अली मिरसाहेब, मा. मनीष दादा भांबुरकर, पोलीस पाटील प्रकाश दादा गावंडे, महेंद्रजी कराळे, सतीश जी राऊत, महादेव अण्णा गावंडे, राजू भाई खान,हे उपस्थित होते.

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत असताना दिव्या विठ्ठल राव नहाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभाव याची शिक्षण भारतीय समाजाला दिले असे मत महेश गनगणे यांनी व्यक्त केले



    राष्ट्रवादीचे नेते रामप्रभू तराळे यांनी मानव कल्याण, शेतकऱ्यांचे कैवारी व स्त्रियांचा आदर करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्यांचे विचार समाजाने जोपासले पाहिजेत यावर आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर  धार्मिक दंगली न होता अशा प्रकारचा एकतेचा कार्यक्रम नेहमी आयोजित करण्यात यावा असा विश्वास मनिष भांबुरकर यांनी व्यक्त करून दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम समाजातील कलागुण कौशल्य ओळखून त्यांना महत्वाच्या पदावर ती बसवलं असे मत शोएब अली मिरसाहेब यांनी व्यक्त केले, तर मुस्लिम समाजाला सोबत घेऊन या देशाचं भविष्य घडू शकते असे मत मौलाना नदीम यांनी यावेळी व्यक्त केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्ष ह.भ.प. आत्मारामजी वाकोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका धर्माची किंवा समाजाची मक्तेदारी नसून संपूर्ण देशाचे आदर्श आहेत व या विचाराचे आचरण अनुसरून प्रत्येकाने करावा तरच देशाची प्रगती होईल असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन सलमान खान यांनी तर प्रास्ताविक धनंजय  गावंडे, आभार प्रदर्शन स्वराज भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन धनंजय गावंडे, मराठा नगर मधील युवक निसर्गप्रेमी फाउंडेशन व एकता फाउंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांनी केले होते