Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धनाडय व सदन लोकांचा घरकुल यादीत समावेश बेराळा येथील प्रकार

Responsive Ad Here

वंदना गवई

 घरकुलचा स्थळ पाहणीसह पुर्नसर्व्हेक्षण करुन गरजुंना लाभ दया नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिज बुलडाणा ची मागणी

        चिखली:- मौजे बेराळा येथील घरकुल योजनेत खरे लाभार्थी डावलुन धनाडय व सदन कास्तकार नोकरदार, पेन्शनर यांना समाविष्ट केल्या प्रकरणी सदर मंजुर घरकुल यादीचे पुर्नसर्वेक्षण करण्यात येऊन संबंधीत दोषि अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी साठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिज बुलडाणा जिल्हयाच्यावतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांना देण्यात आले. निवेदनात नमुद चिखली तालुक्यातील मौजे बेराळा ग्रामपंचायत मध्ये भोंगळ व मनमानी कारभार सुरु असल्याचे चित्र स्पष्ट दिसुन येत आहे. राज्य शासनाची घरकुल योजना हि अत्यंत गरीब व गरजु लाभार्थ्यांना लाभ न देता ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्राम सचिव यांनी संगनमताने खरे लाभार्थी डावलून ग्रामपंचायतचे सदस्यांचे जवळचे नातेवाईक, ग्रामपंचायत चे कर्मचारी, धनाडय व सदन कास्तकार, नोकरदार, पेन्शनर, अशा लोकांचे नांव घरकुल योजनेच्या मंजुर यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे. ग्रामपंचायत ने घरकुल योजनेची मंजुर यादी प्रसिध्दीस दिली आहे त्यात एक ही खरे लाभार्थीचे नांव नाही. तसेच गावात न राहणारे कामधंदयासाठी बाहेर गावी गेलेले अशा लोकांकडुन टेबलाखालुन व्यवहार करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच भारतीय संविधान अंतर्गत महिलांना लोकप्रतिनीधी पद दिलेले असतांना त्यांचे नातेवाईक जसे पती, देर, मुलगा, वडील हेच सदर ग्रामपंचायतचा मनमानी कारभार करीत आहेत. सदर महिला प्रतीनीधींना कोणतीच माहिती न देता सदर महिला लोकप्रतीनीधींच्या खोटया सहया घेऊन ग्रामपंचायतचे सचिव यांच्या सहकार्याने भोंगळ कारभार करीत आहेत. तसेच सदर घरकुल योजनेत लाखो रुपयांची देवाण घेवाण झाल्याची चर्चा सद्या गावात व परीसरात सुरु आहे.


        ग्रामसभेसाठी तीन दिवस अगोदर दवंडी देणे आवश्यक असतांना दि.१९/०२/२०२२ रोजी दवंडी देऊन सभेची वेळ सकाळी ११.०० वाजता दिली परंतु सकाळी ९.०० वाजताच सभा उरकुन घेत गावातील नागरीकांची दिशाभुल करुन सहया घेण्यात आल्या. अशा प्रकारे मौजे बेराळा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार सुरु असल्यामुळे वरील सर्व प्रकाराची प्रत्यक्ष जातीने लक्ष देऊन चौकशी करण्यात यावी तसेच सदर घरकुल योजनेची मंजुर यादी रद्द करण्यात येऊन प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण करुन घरकुलाची नविन यादी तयार करण्यात यावी. असे निवेदन नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज बुलडाणा जिल्हयाच्या देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच मागणी पुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण किंवा इतर तीव्र स्वरुपाचे आंदोलण करण्यात येईल असा ईशारा देण्यात येऊन 

    जिल्हाधिकारी बुलडाणा, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प. बुलडाणा मा. अॅड. केवलजी उके, प्रदेश महासचिव, नॅशनल मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र राज्य, पी. एस. खंडारे, प्रदेश सहसचिव, नॅशनल मुव्हमेंट फॉर जस्टीज यांना सदर निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आलेल्या आहेत. यावेळी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिज चे विदर्भ सचिव भारत गवई, विदर्भ संघटक प्रशांत झीने, जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे, जिल्हा सल्लागार अॅड दिलीप यंगड, जिल्हा संन्मवयक सौ आशाताई कस्तुरे, जिल्हा सचिव प्रेमानंद सरकटे, तालुका अध्यक्ष विनोद सोनटक्के, परमेश्वर इंगळे, तालुका उपाध्यक्ष विनोद जाधव, राजेंद्र सुरडकर, शहर अध्यक्ष संकेत जाधव, संजय जाधव, संदिप सुरडकर, अरुण जाधव, विष्णु जाधव, मंगेश जाधव, शुभम जाधव, संदिप मघाडे यांच्या निवेदनावर सहया आहेत.