Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहुर येथील मेडिकल विरूद्ध लेखी तक्रार देऊन सुद्धा आयुक्तांचे कारवाई कडे दुर्लक्ष

Responsive Ad Here

जामनेर.प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील पहुर येथील औषधी दुकानांवर फसवणूक झाल्यामुळे पहुर येथील रहिवासी प्रविण कुमावत यांनी जळगाव जिल्हा अन्न व औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त वि.व.तासखेडकर यांच्या कडे दि.२४ रोजी लेखी तक्रार अर्ज दिला होता.

लेखी अर्ज देऊन आज तब्बल १२ झाले. परंतु लेखी तक्रारा नुसार आज पर्यत संबंधित मेडिकल लर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसुन येत नाही. कारवाई का होत नाही असा प्रश्न तक्रारदारांना व पहुर मधल्या रहिवासींच्या मनात होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त का या तक्रारी कडे दुर्लक्ष करताय या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पहुर गावांमध्ये विविध मेडिकल वर ब्रॕन्डेड औषधांच्या नावाखाली रूग्णांना न सांगता जनेरीक औषधी देवुन रूग्णांची दिशाभूल करण्याचा प्रकार तक्रार दिल्यानंतर सुद्धा घडतांना दिसुन येत आहे.


  आणि कोणत्याही प्रकारचे बिल रूग्णांना दिले जात नाही. दिलेल्या लेखी तक्रार अर्जावर अन्न व औषधी प्रशासन जळगाव यांनी लवकरात लवकर काही कारवाई केली नाही. तर अपिलीय प्राधिकारी सह आयुक्त नाशिक विभाग यांच्या कडे लेखी तक्रार देणार असल्याचे तक्रारदार प्रविण कुमावत यांनी सांगितले.