Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांची भोपळे विद्यालयाला भेट

Responsive Ad Here

हिवरखेड जितेश कारिया

 आज दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी तेल्हारा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री प्रदीपजी चोरे साहेब यांनी सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड  येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शालेय  कामकाज व शाळेत घेत असलेल्या उपक्रमाबद्दल  समाधान व्यक्त केले. या भेटीचे औचित्य साधून महात्मा फुले शिक्षण संस्था, हिवरखेड च्या वतीने प्रदीपजी चोरे साहेबांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पुढील महिन्यात होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या बोर्ड परीक्षा बद्दल मार्गदर्शन करून त्याचा आढावा घेतला.



तसेच भेटीदरम्यान विद्यालयातील NMMS शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व शाळेतील त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करून परिपूर्ण करण्याच्या हेतूने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, अभ्यास केंद्र सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड येथील आधार कार्ड केंद्राला सुद्धा भेट देण्यात आली. सदर भेटीदरम्यान पंचायत समिती कार्यालय तेल्हारा येथील विस्तार अधिकारी श्री दिनेशजी दूतंडे साहेब, केंद्रप्रमुख श्री गायगोळ सर, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, सहकार्यवाह श्यामशील भोपळे, दानशूर व्यक्ती बाळासाहेब मेतकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या कु. वालोकार मॅडम तसेच  सहदेवराव भोपळे विद्यालय व श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा येथील सर्व शिक्षक वृंद , केंद्र शाळा हिवरखेड येथील मुख्याध्यापक श्री पोके सर, गोपाल गी-हे सर हे उपस्थित होते.