जितेश कारिया हिवरखेड
हिवरखेड येथे कोरोणाच्या नियमांना अनुसरून ठिकठिकाणी शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली स्थानिक मराठा नगर येथील भवानी माता मंदिराजवळ ,शंकर संस्थान देवळी वेस, चंडिका चौक ,ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन ,संजय हिवराळे यांच्या घराजवळ इंदिरानगर यासह विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती व प्रतिमेचे ठिकठिकाणी पूजन करण्यात येऊन महाराजांच्या जीवनावरील पोवाळे विविध ठिकाणी वाजवून रांगोळ्या काढण्यात आल्या तथा फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येऊन नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुलभाताई दुतोंडे ,सरपंच सीमाताई राऊत, दुय्यम ठाणेदार दातीर साहेब ,पोलीस पाटील प्रकाश गावंडे, उपसरपंच रमेश दुतोंडे, माजी सरपंच संदीप इंगळे, सुरेश ओंकारे, शेख सादिक, अनिल कराळे ,डॉ राम तिडके, पुरुषोत्तम गावंडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे, कमिलअली मिरसाहेब, रज्जाक भाई अपर्णाताई ढबाले ,महेंद्र कराळे, विलास घुंगळ, प्रकाश राऊत ,संजय हिवराळे, मनीष भांबुरकर, बीड जमदार गोलाईत मेजर ,नेव्हारे मेजर ,गवई मेजर ,रवींद्र वाकोडे रवी मानकर, शेख आदिल, महादेव गावंडे,मो. शफाकत, बजरंग तिडके ,गोपाल घुंगळ, वीरेंद्र येऊल, रशीद भाई, मोईज जमादार ,नरेश बांगर ,अंकुश निळे ,अशोक म्हस्के, पंकज टावरी, रवी गावंडे, प्रदीप पाटील ,देशमुख बाप्पू,पत्रकार बाळकृष्ण नेरकर ,राजेश पांडव ,सुरज चौबे ,धीरज बजाज ,किरण सेदानी, अर्जुन खिरोडकर केशव गावंडे, वैभव गावंडे, प्रवीण गावंडे, अक्षय तिजारे, विक्की धांडे, गोपाल मोरोकर, गजानन भटकर यांच्यासह शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्ती व प्रतिमेचे पूजन करून फटाक्यांच्या आतषबाजीने शिवजयंती साजरी करण्यात आली.