जामनेर प्रतिनिधी
पंचायत समितीचा कारभार सुधारेल का?
पंचायत समितीमध्ये लाचलुचपत विभागाने रोजगार हमी योजनेच्या टेबलवर ती काम करणारे क्लर्क वसंत बारी यांना रंगेहात पकडल्याने पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली होती आणि त्यांनी जबाब मध्ये लाल लुचपत प्रतिबंधक विभागाला जामनेर पंचायत समितीमध्ये कार्यप्रणाली बाबत माहिती दिल्याने समजते त्या वरून गट विकास अधिकारी देखील यात सामील असल्याची चर्चा तालुक्यात होतीत्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी गटविकास अधिकारी श्रीमती जे व्ही कवडदेवी यांनी थेट मंत्रालयातून कायद्याच्या चौकटीत राहून कामात अनियमितता करत असल्याचा ठपका ठेवून बदली करून घेतल्याची चर्चा जामनेर पंचायत समितीमध्ये आहे.
या प्रकारामुळे मात्र पंचायत समितीतील कारभार थंडावला असून लोकांची कामे होत नसल्याने जनतेला त्रास होत आहे तरी लोकप्रतिनिधी यांनी कारभार नियमित व स्वच्छ कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा जामनेर तालुक्यात बोलले जात आहे.रोजगार हमी योजनेची नवीन सदस्यांची एकही बैठक पंचायत समिती मध्ये झाली नसल्याने रोजगार आम्ही सदस्य यांनी ताबडतोब बैठक घ्यावी अशी मागणी पंचायत समितीकडे केली आहे