दिनांक 19/03/2022 शनीवार रोजी ज्येष्ठ नागरिक संघ साई नगर अमरावती येथे आयोजित कार्यक्रमाचे नियोजन खूप सुंदर होते डाॅ.सौ मीनाताई गावंडे यांनी सरळ व साध्या भाषेत उतकृष्ट मार्गदर्शन केले महिलांनी प्रपंच सांभाळून स्वतःमधील सुप्त गुण ओळखून स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण करावे याबाबत उदाहरणासहीत मार्गदर्शन केले. यामधे संपुर्ण नवनिर्वाचित कार्यकारिणीने फार अल्प कालावधीत नियोजन करून उतकृष्ट कार्यक्रम महिलादिनानिमीत्त समाजातील महिलांकरीता सादर केला . या कार्यक्रमास समाजातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
मंचावर सर्वश्री शरदराव देवरणकर अध्यक्ष,प्रा.शरदराव पुसदकर माजी अध्यक्ष प्रमुख पाहुणे डॉ मीनाताई गावंडे,महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ तृप्तीताई व्यवहरे जिल्हा संघटक सौ दिपाताई बेलबागकर हे होते. सदर कार्यक्रमास श्री शैवगुरव हितकारीणी मंडळ अमरावतीचे सन्माननीय पदाधीकारी उपस्तीत होते
पहिल्या सत्रात समाजातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार मधे श्रीमती सोनाली खंडार करोना कार्यकाळात अहोरात्र काम केल्याबद्दल, सौ मोहीणी प्रदिपराव कुळकर्णी यांचा उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ मीनाताई गावंडे यांचे मार्गदर्शन झाले.दुसर्या सत्रात महिला करीता सरप्राईज वक्तृत्व स्पर्धेत
तीन पारितोषिक
1)सौ वैशाली गणेशराव आरोकार प्रथम पुरस्कार
2) सौ निलीमाताई अंजीकर
द्वितीय पुरस्कार
3) सौ सविता चिखलकर
तृतीय पारितोषिक महिलांकरीता वेशभुषा स्पर्धेत
1)सौ निता पांडे -- जिजाऊ वेषभुषा
2) कांचन सराफ --सावित्रीबाई वेशभुषा
परिक्षक:-- डाॅ.प्रा.सौ सुनीताताई बाळापुरे यांनी केले कारेकर्माचे प्रास्ताविक महिला आघाडीच्या सचिव संजीवनी मारोटकर सूत्र संचालन पहिल्या सत्राचे नलिनीताई चिखलकर,उपाध्यक्षा व दुसऱ्या सत्राचे मधुरिताई तायडे सकोषाध्यक्ष आभारप्रदर्शन सपना भेडकर सहसचिव यांनी केले.कारेकमच्या यशस्वीतेसाठी महिला कार्य करणीच्या उपाध्यक्ष सौ साधना बोराटने,नलीनि चिखलकर,सचिव संजीवनी मारोटकर,सहसचिव वेशाली आरोकर,सपना भेडकर कोशाध्यक्ष नीलिमा ताई अजिकर,सकोषाध्यक्ष माधुरी तायडे,कुंदा पुस्तकर,जिल्हा संघटिक दिपाताई बेलबाकर मार्गदर्शक डॉ प्रा सुनीताताई बाळापुरे,भारती तायडे,वर्षा ताई कुरेकर,ऍडोकेट हितेशनी ताई देवर्णकर ,संध्या ताई पुस्तकर,शुभागीताई पुस्तकर व सर्व महिला सदस्य यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाची सांगता होळी मिलन ,केक कटींग आणि अल्पोपाहार चहा ने झाली.
