Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मोबाईलचा अति वापर धोकादायक, श्री अशोक लांडे ,ठाणेदार

Responsive Ad Here

प्रतिनिधी वंदना गवई 

        सातगाव भुसारी येथे श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे दिनांक 22 /03 /2022 ते 28/0 3 /2022 या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 24 /03 /2020 ला प्रमुख वक्ते म्हणून श्री अशोक लांडे ठाणेदार चिखली पोलीस स्टेशन तसेच प्रतिभा भुतेकर अंधश्रद्धा निर्मूलन सदस्य उपस्थित होते श्री अशोक लांडे यांनी कायदा-सुव्यवस्थेत विद्यार्थ्यांचे योगदान व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करून स्वयंसेवकांना संदेश दिला की जीवनात जर काही बनायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही मोबाईल आपल्यापासून दूर ठेवावा त्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही कारण या मोबाईल मुळे अनेक गैरप्रकार वाढलेले आहेत तसेच अपघात टाळायचा असेल तर आपण आपला वेग मर्यादित ठेवला पाहिजे कारण आपल्या मुळे घरावर काळी छाया पसरता कामा नये असे त्यांनी आपल्या वक्तव्य मधून सांगितले. 



प्रतिभा भुतेकर यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये समाजामध्ये घडत असलेल्या अंधश्रद्धेची उदाहरणे देऊन त्याची प्रात्यक्षिकेही करून दाखविली अंगात येणे जादू टोना भूत बाधा काही नसून हा काही मानसिक आजार आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्य मधून सांगितले. हवेत हात फिरवून सोन्याची चेन काढणे, कापूर खाने अंगारा काढणे, हातचलाखी असून त्यांनी याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. श्रमसंस्कार शिबिरांमध्ये मार्गदर्शन करतांना श्री अशोक लांडे, ठाणेदार व प्रतिमा भुतेकर, अंनिस संघटकया सत्राचे प्रास्ताविक डॉ. अनुराधा मुळे यांनी केले असून शिबिराची पार्श्वभूमी सांगितली .या शिबिराचे सूत्रसंचालन सचिन या स्वयंसेवकांनी केले , तर आभार प्रदर्शन विशाल या स्वयंसेवकांनी केले . शिबिराकरिता स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.