वंदना गवई
नेत्याने खांद्यावर हात टाकला वरून एखाद्या बुथची जबाबदारी हातात खर्चासाठी हजार दोन हजार दिले की आतून आवाज निघतो -
साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है...!
रॅलीत साहेब आलिशान गाडीत तो मागे धूळ खातो
साहेब विरोधकांना हसून जोडता हात तो खुनशी नजरेने पाहतो सभेत साहेब दुःखावर झोडता भाषण तेव्हा बेंबीच्या देठापासून घोषणा देतो
आश्वासनांचं वाटता रेशन
येऊन येऊन येणार कोण ? साहेबांशीवाय आहेच कोण....??
निवडून आल्यानंतर
तो गुलालात लालच लाल नेत्याचे आभाराचे कोरडे फराळ
आता अंधार मिटला
नवा सूर्य उगल
सगळं मिळल जो जे मागल .. तेव्हा उत्सहाने आरोळी फटते.आरे विरोधकांचे झाले काय ? खाली डोके वर पाय.…….!!
दुसऱ्या दिवसापासून नेत्याभोवती सगळे टेंडर किंग
कार्यकर्ता गावात
देशी घेऊन टांग टिंग...
तो एखाद्या वेळी उत्साहाने घेऊन जातो लोकांची कामं..
पण होत नाही ..!
अनेकदा नेता वेळ सुद्धा देत नाही..!!
नेत्याचे वाढत जातात मॉल उपाशी कार्यकर्त्याला
पक्षनिष्ठेचं फेविकॉल ...
त्याला आता ओरडता येत नसलं तरी तो मनातल्या मनात म्हणतो
आरे गली गली मे किसका शोर है ?
हमारा हो या तुम्हारा.. साले सब चोर है....!!
जन सेवक .रवि मगर
