जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर पाळधी येथे युवा सेना सचिव वरूण देसाई हे संभाजीनगर हुं जळगाव कडे जात असताना त्यांचे वाकोद पहूर पाळधी येथे ढोल-ताशाच्या फटाक्यांची आतिषबाजी जोरदार स्वागत करण्यात आले पहुर पाळधी येथे जामनेर तालुक्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांना संबोधित करताना म्हणाले की आज तुमचे एवढे प्रेम पाहून रात्रीसुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित मन भारावले जामनेर तालुक्यात भगवे वादळ असल्याचे दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात गावांमध्ये भगवे वादळ निर्माण झाले असून येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल वरूण देसाई यांनी सांगितले
युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव वरूण देसाई यांचे स्वागत व सत्कार युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील यांनी हार गुच्छ देऊन स्वागत केले त्यांच्यासोबत युवासेना कोअर कमिटीचे सदस्य अमेय धुले अजिंक्य जुमळे अंगद प्रभू सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पत्रकार गणेश पांढरे माजी उपजिल्हाप्रमुख युवा सेना एडवोकेट भरत पवार विधानसभा क्षेत्रप्रमुख निळकंठ पाटील संजय गांधी निराधार समिती सदस्य बाबुराव पाटील युवा सेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे आदी पदाधिकारी यांनी स्वागत केले याप्रसंगी मयुर पाटील मुकेश जाधव शेंदुर्णी शहर भैय्या गुजर शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल युवराज बारी रोहन राठोड रमण शिरसागर कैलास दांडगे दीपक माळी राहुल जाधव फौर युवासेना प्रमुख शुभम घोलप यांच्यासह जामनेर तालुक्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वैद्यकीय आघाडीचे तालुका समन्वयक प्राध्यापक ईश्वर चोरडिया तर आभार डॉक्टर वैभव पाटील यांनी मानले
