मो. असलम परवेज लोणार
पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सकाळी ३:०० वाजेपासून उपवास (रोजा) ठेवण्याकरिता उठून आवश्यक विधी (सहरी) करतात. संध्याकाळी ६:४५ वाजेपर्यंत हा उपवास सोडण्यात येतो. असा भर उन्हाळ्यात १५ ते १६ तासाचा दीर्घ उपवास (रोजा) असतो. सकाळी ३:०० वाजेपासून उपवास ठेवण्याची तयारी करण्या पासून ते संध्याकाळी ८:०० ते १०: ०० वाजेपर्यंत सर्व मुस्लीम बांधव व भगिनी नमाज पठाण, कुरान पठाण व इतर धार्मिक विधि करतात. या दोन्ही वेळेमध्ये लोणार शहरात भारनियमन लावण्यात आलेले आहे. ज्यामुळे मुस्लिम बांधवांना उपवास ठेवण्या करिता व रमजान महिन्याचे विधी करण्याकरिता अडथळा निर्माण होत आहे.
याची दखल घेत मंगळवार दि.१२ एप्रिल २०२२ रोजी लोणार विद्युत वितरण कंपनीला, लोणार शहराचे भारनियमन त्वरित बंद करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या लोणार ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर मो.आकिब मो. तौफीक कुरैशी, जिल्हा सचिव कांग्रेस कमेटी (ओबीसी विभाग) शेख जुनेद शेख बिलाल कुरैशी AIJQAC बुलढाणा जिल्हा सहासचिव,मो. तौसीफ मो. तौफीक कुरैशी, शेख हामिद शेख अबुशमा कुरैशी, AIJQAC तालुका उपाध्यक्ष, शेख रशीद शेख सईद, शेख तौफीक शेख रहेमान चौधरी, शेख शहेज़ाद शेख रफीक कुरैशी, AIJQAC शहर उपाध्यक्ष लोणार, शेख फ़िरदौस शेख नज़ीर कुरैशी, AIJQAC लोणार सहसचिव सोहेल खान तसेच ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षर्या आहेत.
