प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल येथील रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय संस्था एरंडोल , छत्रपती फुले शाहू आंबेडकर नगर यांच्यातर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने भव्य गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक उषाकिरण खैरनार, प्रा.भरत शिरसाठ , प्रा . विजय गाढे , प्रा.उमेश सूर्यवंशी , सामजिक कार्यकर्ते ईश्वर बि - हाडे , धनंजय खैरनार , कृष्णा ओतरी , प्रकाश शिंदे , बी एस . भगत , नितीन बोरसे , यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सुनिल खोकरे म्युझिशियन ग्रुप तर्फे छत्रपती, फुले,शाहू,आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील व कार्याचा गौरव करणारे गीतांचा भव्य जुगलबंदी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी खान्देश परिचित गायक प्रा . उमेश सूर्यवंशी व गायक नितीन खोकरे यांनी दमदार गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली . याप्रसंगी विविध समाज बांधव बाहेरगावाहून कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपति , फुले , शाहू , आंबेडकर नगर, ब्ल्यू बॉईज फाउंडेशन , जयभिम ग्रूप विखरन , रमाबाई आंबेडकर नगर एरंडोल , भिमजन्मोउत्सव समिती यांनी परिश्रम घेतले.
