लक्ष्मण चोरमंगे प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव विश्व हिंदू परिषेदेचे कार्यकर्ते, व गोरक्षक मछिंद्र शिर्के यांनी मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (जुने तहसील )मालेगाव येथे धरणे आंदोलन केले, उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव यांनी काढलेल्या सदर 144(2)चा आदेशा च्या विरोधात आपल्या परिवारासोबत म्हणजेच पत्नी सह व दोन चिमुकल्या मुलांना घेऊन आंदोलनाला बसले,व उपविभागीय दंडाधिकारी, मालेगाव यांनी मालेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळापासून दोनशे मीटर अंतरावर थांबून राहण्यास मनाई,करणारा उपविभागीय दंडाधिकारी,मालेगाव यांच्या 144(2)च्या आदेशा विरोधात हे धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच हे आदेशाचे पालन करण्यासाठी राहण्याचा व उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने उपविभागीय जिल्हाधिकारी यांचा शासकीय बंगला निवासासाठी व उपजीविकेसाठी प्रांत कार्यालयाचा परिसर उपलब्ध करून द्यावा
अशी मागणी मछिंद्र शिर्के व त्यांच्या परिवाराकडून करण्यात आली,या कारणाने त्यांच्या परिवाराचा उदर निर्व्हहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला,व त्यांचा दूध हा व्यवसाय असल्यामुळे त्यांना आपल्या परिवाराचा उदर्निवाह दूध हा व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करत असतात, म्हणून त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय( जुने तहसील)मालेगाव येथे गोरक्षक मछिंद्र शिर्के,व् पत्नी कविता शिर्के,व दोन बालके, शंभूराजे शिर्के,हिंदवी शिर्के,व परिवाराच्या वतीने मछिंद्र शिर्के यांनी पत्नी व आपल्या लहान बालकासोबत भर उन्हात धरणे आंदोलन केले,
