Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

60 वर्षीय वृद्धाचा डोक्यात विट घालून निर्घुण खुन

Responsive Ad Here

 योगेश सोनवणे मलकापूर प्रतिनिधी


मलकापूर:- गाडेगाव हनुमान मंदिर पवनसुत नगरातील रहिवासी अशोक उत्तम सोनोने वय 60 याचा डोक्यात विट घालून निर्घुण खुन केल्याची घटना आज पहाटे दरम्यान घडली.

   याबाबतची माहिती पत्रकार गजानन ठोसर,संतोष घाटे यांनी शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांनी दिली क्षणाचाही विलंब न लावता पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, डि.बि. पथकाचे ऐ.पि.आय सुखदेव भोरकडे,ऐ.पि.आय.स्मिता म्हसाये, पो.उप.नि बालाजी सानप, रतनसिंग बोराडे,पो.काॅ ईश्वर वाघ, प्रमोद राठोड, सलीम बरडे, संतोष कुमावत,शेख आशिफ, मंगेश चरखे, निलेश तायडे, घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक राजपूत यांनी याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांना दिल्याने अमोल कोळीही घटनास्थळी दाखल झाले. 



   घटनास्थळी डॉग स्काॅड,फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले. अवघ्या दोन तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध शहर पोलिसांनी लावला असुन नळगंगा नदीतिरावर असलेल्या गजेंद्र डवले यांच्या विट भट्टीवर काम करणाऱ्या ईसमासोबत  दुध व दारुच्या उधारीवरुन बोलचाल झाल्याने अशोक सोनोने च्या डोक्यात व तोंडावर विटांनी विष्णु शालीग्राम चंदन वय 42 रा.कंडारी ता.भुसावल याने मारल्याने व  अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद मृतकाची सुन सौ.चंदा निलेश सोनोने वय 34 रा.विकास नगर,मलकापुर हिने शहर पो.स्टे.ला दिल्यावरुन शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ऐपीआय स्मिता म्हसाये करीत आहे.