प्रतींनिधी
महाराष्ट्र मधून रोलबाँल खेळाच्या प्रशिक्षणासाठी पुणे येथुन ३ सागंली येथील १ तर विदर्भातील एकमेव बुलढाणा तील चिखली तालुक्यातील १ खेळाडूंची रोलबाँल एन.आय.एस. या प्रशिक्षण शिबिरासाठी नेताजी सुभाष नँशनल इंस्टूटुट आँफ स्पोर्ट्स पटियाला (पंजाब) येथे निवड झाली आहे.या प्रशिक्षण शिबिर मध्ये खेळाडूंना रोलबाँल या खेळाची सविस्तर माहिती ,प्रशिक्षण, एक उत्कृष्ट प्रशिक्षक कसा असावा याचे रोलबाँल खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतभरातुन विविध राज्यातील 34 खेळाडूंची निवड झाली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंचा समावेश आहे.
महेश उभे (राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पंच) विशाल मालपोटे (राष्ट्रीय खेळाडू) सौरभ भालेराव (राष्ट्रीय खेळाडू)संकेत आवळे (राज्यस्तरीय खेळाडू राष्ट्रीय पंच) सांगली देवानंद नेमाने (राज्यस्तरीय खेळाडू व राष्ट्रीय पंच)चिखली जि.बुलढाणा या खेळाडूंना रोलबाँल खेळाचे जनक मा.श्री. राजु दाभाडे सर प्रताप पगार सर चेतन भांडवलकर सर, या खेळाडूंनी त्यांच्या यशाचे श्रेय आपले आई वडील व प्रशिक्षकांना दिले.
