प्रदिप रघुते येनस प्रतिनिधी
घर धुरमुक्त करण्यासाठी व जंगलतोड कमी करण्याच्या हेतुने शासनाने घरोघरी उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचा मोफत पुरवठा केला.परंतु सिलिडरच्या किमतीत वाढ होत असल्याने महिलांवर शेगडीवरून परत चुली पेटविण्याची वेळ आली आहे.घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झाली.पहिलेच माहागाईने नाकी नव आले सततच्या वाढणाऱी महागाई पाठ सोडत नसल्याने गोरगरीबांचे आर्थिक बजट कोलमडले आहे.या माहागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे.कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले.शेतकरी बि.बियान्याने नाकी नव आले.शेतकरी सोयाबिन तिनं हजारांने विकतो.सोयाबिनची बॅग चार हजाराने घेतो.
अशा लुटमारीच्या सरकारच्या भाडगडीत ससराचा गाडा कसा हाकलावा असा प्रश्न आज अमरावती जिल्ह्या मध्ये निर्माण झाला आहे.अशातच सिलिंडरच्या किमतीत वाढ होऊ लागल्याने जनता त्रस्त झाली आहे.1070 रुपये प्रति सिलीडर असा लुटमारीचा दर झाला.याच बरोबर जिवनावश्क वस्तुंच्या किमतीमध्ये ही मोठी वाढ झाली आहे.या सर्व वस्तुंच्या दरवाढीचा परिणाम सर्वात जास्त हा भुमिहीण वर्गावर आलेला आहे.सिलिडर भाव वाढ ग्रामिणभागातील ग्रामस्थांना परवडणारी नसल्याने शेगडी नको ग बाई माझी चुलच बरी अशी हाक जोर धरत असल्याचे चित्र परिसरात दिसुन येत आहे.
सबसिडी ही बंद
शासनाकडुन सिंलिडरवर सबसिडी दिली जाते होती.मिळत असलेल्या सबसिडी मुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळत होता.परतु सिलिंडर वर मिळणारी सबसिडी आता बंद करण्यात आली सिलिंडरच्या दरात कपात करण्याची मागणी तालुक्यातील गूहिर्णीकडून होत आहे.
