Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बस स्थानकामधिल त्या दुकानाला एस.टी. महामंडळाच्या अधिकार्यांचे अभय, तक्रार करुनही दुर्लक्ष

Responsive Ad Here

योगेश सोनवणे मलकापूर प्रतिनिधी

     मलकापुर बस स्थानकाच्या आवारात असणारे व महीला प्रसाधान गृहा लगतच असणाऱ्या दुकानासंबधीची तक्रार हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने संबधित अधिकार्यांना देण्यात आली होती. बस स्थानकातील महीला प्रसाधन गृहाजवळच हे दुकान असल्याने येथे महीला प्रसाधन गृहामधे गेल्या असता या दुकान चालकांकडून व दुकान चालकांमार्फत गोळी बिस्किटे विक्री करणाऱ्या अवैध विक्रेत्यांकडून महिलांची तसेच ग्रामीण भागातील शिक्षणासाठी येणाऱ्या विद्याथींनीची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नेहमीच सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर व अग्रेसर असणाऱ्या हिंदी मराठी पत्रकार संघाला काही सुज्ञ व दक्ष नागरिकांनी कळविल्या होत्या. 



  त्या अनुषंगाने हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे त्या आशयाचे निवेदन संबंधित अधिकार्यांना देण्यात आले होते. परंतु त्या निवेदनाची कुठलही दखल न घेता गंभीर असणाऱ्या या विषयाला जाणीवपूर्वक दुर्लक्षीत केले जात असल्याचे लक्षात येते. त्या कारणाने आज दि. 13/06/2022 रोजी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आगार व्यवस्थापक श्री. दराडे यांना स्मरण पत्र देण्यात आले तसेच माननीय तहसीलदार श्री. सुरडकर साहेब व मलकापुर शहर पोलीस स्टेशन ला ही रितसर निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल संबंधित विभागामार्फत त्वरित घेण्यात यावी. अन्यथा हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे    धनश्री ताई काटीकर पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक सतीश दांडगे विदर्भ सचिव अजय टप विदर्भ संपर्क प्रमुख  प्रा. प्रकाश थाटे गौरव खरे जिल्हाध्यक्ष उल्हासभाई शेगोकार तालुका अध्यक्ष प्रा. कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता नागेश सुरंगे जिल्हा संपर्कप्रमुख करण झनके तालुका संघटक दीपक ईटणारे शहर अध्यक्ष  धर्मेश राजपूत शहर संघटक योगेश सोनवणे शहर संघटक उपस्थित होते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते